उत्तर प्रदेशमधील बदायू येथे एका १५ वर्षाच्या मुलाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलाला प्रशासनाने अनोखी शिक्षा सुनावली असून १५ दिवसांसाठी गोशाळा स्वच्छ करण्यास सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांचा छेडछाड केलेला फोटो शेअर करत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यावर बाल न्याय मंडळाने मुलाला शिक्षा सुनावली आहे. मुलाला १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सरकारी वकील अतुल सिंह यांनी सांगितलं की, “१५ वर्षाच्या मुलाविरोधात या महिन्याच्या सुरुवातीला कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. त्याचं वय लक्षात घेता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे”.