योगींविरोधात आक्षेपार्ह पोस्ट शेअर करणाऱ्या १५ वर्षाच्या मुलाला शिक्षा; १५ दिवस स्वच्छ करायला लावली गोशाळा

मुलाला १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे

UP, Uttar Pradesh, Social Media, Yogi Adityanath, Gaushala,
मुलाला १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे (File Photo: PTI)

उत्तर प्रदेशमधील बदायू येथे एका १५ वर्षाच्या मुलाला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर शेअर केल्यामुळे शिक्षा सुनावण्यात आली आहे. मुलाला प्रशासनाने अनोखी शिक्षा सुनावली असून १५ दिवसांसाठी गोशाळा स्वच्छ करण्यास सांगितलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाने सोशल मीडियावर योगी आदित्यनाथ यांचा छेडछाड केलेला फोटो शेअर करत आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. यावर बाल न्याय मंडळाने मुलाला शिक्षा सुनावली आहे. मुलाला १० हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

सरकारी वकील अतुल सिंह यांनी सांगितलं की, “१५ वर्षाच्या मुलाविरोधात या महिन्याच्या सुरुवातीला कलम ६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होतं. त्याचं वय लक्षात घेता ही शिक्षा सुनावण्यात आली आहे”.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttar pradesh 15 year old boy write objectionable post on cm yogi gaushala cleaning punishment sgy

Next Story
“राज ठाकरेंनी शरद पवारांकडून…”, ‘ते’ फोटो व्हायरल झाल्यानंतर भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांचा खुलासा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी