उत्तर प्रदेश विधानसभेमध्ये एकीकडे अनेक उमेदवार निवडणूक जिंकण्याच्या उद्देशाने निवडणुकीच्या रिंगणात उतरत असताना एक व्यक्ती मात्र पराभव व्हावा म्हणून विधानसभा निवडणूक लढवण्याचा विचार करतोय. विशेष म्हणजे या व्यक्तीने आतापर्यंत ९३ वेगवेगळ्या निवडणुका लढल्यात. या सर्व निवडणुकांमध्ये त्याचा पराभव झालाय. मात्र तरीही त्याने ९४ व्यांदा निवडणूक अर्ज करण्याची तयारी सुरु केलीय. या व्यक्तीला १०० वेळा निवडणुकीमध्ये परभूत होण्याचा विक्रम करायचाय. काय धक्का बसला ना वाचून? पण हे खरं आहे. या व्यक्तीचं नाव आहे हसनू राम. मला यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्येही पराभूत होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही, असं हसनू राम यांनी म्हटलंय.

समोर आलेल्या माहितीनुसार ९३ वेळा पराभूत झाल्यानंतर हसनू राम हे त्याच उत्साहाने निवडणुकीचा अर्ज करणार आहेत. ही हसून यांची उमेदवार म्हणून ९४ वी निवडणूक असणार आहे. मात्र यंदाही आपल्याला पराभूत होण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही, असा दावा हसनू यांनी केलाय. आपण १०० निवडणुकींमध्ये पराभूत होण्याचं लक्ष्य समोर ठेवलं आहे. हा विक्रम मला माझ्या नावावर करायचा आहे, असं हसनू सांगतात.

narendra modi
पंतप्रधानांकडून प्रचारात जुनेच मुद्दे; विरोधकांची टीका, मित्रपक्षांचीही भिस्त मोदींवरच
Why did Sunetra Pawar say The relationship will improve after the election
सुनेत्रा पवार का म्हणाल्या… निवडणुकीनंतर नात्यात सुधारणा होईल
cm eknath shinde
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता; भाजपच्या दबावामुळे उमेदवारी मिळण्याबाबत साशंकता
eknath shinde and raj Thackeray
मनसेला जागा देण्यास शिंदे सेनेतच विरोध

७५ वर्षीय हसनू वेगवेगळ्या ९३ निवडणुका लढले असून प्रत्येक पराभवानंतर ते आनंद व्यक्त करतात. खेरागड तहसीलमधील नगला दूल्हा येथील रहिवाशी असणाऱ्या हसनू यांच्या या निवडणूक लढण्याच्या आणि पराभवाचं सातत्य सारख्याची कथाही मोठी रंजक आहे.

पराभूत होण्यासाठी कधीपासून आणि का लढू लागले?
३६ वर्षांपूर्वी एका मोठ्या पक्षाने हसनू राम यांना निवडणुकीचं तिकीट देण्याचं आश्वासन देत अंतिम क्षणी तिकीट नाकारलं होतं. हसनू राम यांच्या मनाला ही गोष्ट फार लागली. त्यानंतर तेव्हापासून ते सातत्याने निवडणुका लढवत आहेत. हसनू राम पूर्वी राजस्व विभागामध्ये कार्यरत होते. मात्र निवडणुकांसाठी त्यांनी आपली नोकरी सोडली. नोकरी सोडल्यानंतरही त्यांना पक्षाकडून तिकीट मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी महापालिका निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत सर्वच निवडणुका लढवण्यास सुरुवात केली.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी जन्म झालेल्या हसनू राम हे अंबेडकरवादी आहेत. एका पक्षाकडे हसनू यांनी तिकीट मागितलं होतं. त्यावर त्या पक्षाच्या नेत्यांनी हसनू यांना तुला तर तुझा शेजारीही मत देणार नाही. तू निवडणूक लढून काय करणार?, असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर पराभव पचवण्याची तयारी पाहिजे या उद्देशाने हसनू हे प्रत्येक निवडणूक लढवू लागले आणि त्यात पराभूत होऊ लागले.