उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत गोरखपूर शहर मतदारसंघातून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरुद्ध आझाद समाज पार्टी (कांशीराम) या पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांच्या उमेदवारीची घोषणा या पक्षाने गुरुवारी केली. आपण भाजपविरुद्धचा आपला लढा सुरू ठेवू, असे आझाद यांनी म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गोरखपूरमधून पाच वेळा खासदार म्हणून लोकसभेवर निवडून गेलेले योगी आदित्यनाथ हे गोरखपूर शहर मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवतील, असे भाजपने अलीकडेच जाहीर केले होते. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’साठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कांशीराम यांची विचारसरणी पुढे नेत आम्ही चंद्रशेखर आझाद यांना या मतदारसंघातील उमेदवार जाहीर करत आहोत,’ असे पक्षाने समाजमाध्यमावरील एका निवेदनात सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh assembly elections gorakhpur city azad samaj party akp
First published on: 21-01-2022 at 00:16 IST