scorecardresearch

Video : अधिवेशनात भाजपा आमदार तंबाखू खाताना आणि मोबाईलवर पत्ते खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल! विरोधी पक्षानं डागली तोफ!

उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आमदार पत्ते खेळताना आणि तंबाखू खातानाचे व्हिडीओ व्हायरल!

Video : अधिवेशनात भाजपा आमदार तंबाखू खाताना आणि मोबाईलवर पत्ते खेळतानाचे व्हिडीओ व्हायरल! विरोधी पक्षानं डागली तोफ!
उत्तर प्रदेश विधानसभेतील व्हिडीओ व्हायरल!

विधिमंडळाचं अधिवेशन सुरू असताना घडणाऱ्या अनेक घडामोडी चर्चेचा विषय ठरत असतात. मग ते सत्ताधारी आणि विरोधकांमधील आरोप-प्रत्यारोप असोत किंवा मग पायऱ्यांवर होणारी घोषणाबाजी! अशा प्रकारांचे व्हिडीओ देखील तुफान व्हायरल होत असतात. सध्या असे दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये चक्क अधिवेशनाचं कामकाज सुरू असताना आमदार पत्ते खेळत असताना आणि तंबाखू खात असताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल होताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं आहे.

कुठला आहे हा व्हिडीओ?

हा व्हिडिओ उत्तर प्रदेश विधानसभेतला आहे. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी यातला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. समाजवादी पार्टीनं आपल्या ऑफिशियल ट्विटर अकाऊंटवरून हे दोन्ही व्हिडिओ ट्वीट केले आहेत. यातल्या एका व्हिडीओमध्ये एक आमदार महोदय चक्क तंबाखू खाताना दिसत आहेत, तर दुसरे आमदार मोबाईलवर पत्ते खेळताना दिसत आहेत.

‘व्हिडीओ काढणाऱ्या भाजपा आमदाराचे धन्यवाद’

हे व्हिडीओ ट्वीट करताना अखिलेश यादव यांनी सत्ताधारी भाजपावर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. ‘भाजपाचे आमदार उत्तर प्रदेश विधानसभा अधिवेशनादरम्यान पत्ते खेळत असून राज्याचा नाश करत आहेत. ज्यांनी पाठीमागून हा व्हिडीओ शूट केला आणि व्हायरल केला, त्या भाजपाच्या आमदारांचे धन्यवाद.आता हे पाहायचं आहे की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या आमदारांवर नैतिक बुलडोजर कधी चालवणार?’ असा प्रश्न अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे. ‘भार बन गई भाजपा’, असंही त्यांनी ट्वीटच्या शेवटी म्हटलं आहे.

‘अत्यंत लाजिरवाणी बाब’

दरम्यान, सपाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून या व्हिडीओसोबतच अजून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ‘सभागृहाचं पावित्र्य हे भाजपा आमदार भंग करत आहेत. भाजपाचे महोबाती आमदार मोबाईलवर गेम खेळत आहेत तर झाशीमधील आमदार तंबाखू खात आहेत. या लोकांकडे जनतेच्या प्रश्नांवर उत्तरं नाहीत. पण सभागृहाला मनोरंजनाचा अड्डा करून ठेवला आहे. ही लाजिरवाणी बाब आहे’, असं सपानं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेला आता हॉलिवूडमधून पाठिंबा!! ‘या’ अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

काय आहे या व्हिडीओमध्ये?

एकूण दोन व्हिडीओ ट्वीट करण्यात आले आहेत. त्यापैकी एका व्हिडीओमध्ये एक आमदार मोबाईलवर पत्त्यांचा गेम खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे यावेळी सभागृहातील एक महिला आमदार मुद्दा मांडत असल्याचं व्हिडीओमध्ये ऐकू येत आहे.

दुसऱ्या व्हिडीओमध्येदेखील अशाच प्रकारे एक आमदार टेबलखाली लपवून आपल्याकडी डबीतून हातात तंबाखू घेऊन खाताना दिसत आहे. यावेळीही एक महिला आमदार आपली भूमिका सभागृहात मांडताना व्हिडीओत ऐकू येत आहे.

दरम्यान, हे व्हिडीओ व्हायरल होत असताना संबंधित भाजपा आमदारांवर कारवाईची मागणी केली जात आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या