यूपी निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. गोरखपूर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून ४ फेब्रुवारी रोजी ट्विट करण्यात आले होते. या ट्विटमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्राणघातक हल्ल्याची धमकी देण्यात आली होती.

हेही वाचा – आसाम : पुराचे आणखी ७ बळी; राज्यातील स्थिती बिकट, एकूण मृत्यू १०८

आरोपीची कारागृहात रवानगी
यूपी विधानसभा निवडणुकीदरम्यान, ४ फेब्रुवारी २०२२ रोजी, ‘लेडी डॉन’ नावाच्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री योगी यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. निवडणुकीपूर्वी सीएम योगींना मिळालेल्या या धमकीने यूपी पोलिसांची तारांबळ उडाली होती. या प्रकरणी गोरखपूरच्या ठाणे कॅन्टमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचे नाव सोनू असून तो फिरोजाबाद येथे राहतो. सोनूला महिनाभर आग्रा तुरुंगात ठेवण्यात आले होते, त्यानंतर गोरखपूरच्या कँट पोलिसांनी त्याला वॉरंट ‘बी’ अंतर्गत अटक करून गोरखुपर येथे आणले. येथील न्यायालयात हजर केल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.

हेही वाचा – अमेरिकेत महिलांचा गर्भपाताचा अधिकार रद्द; सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, निम्म्या राज्यांत आता बंदीची शक्यता

मेरठ आणि लखनऊमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्या
सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ट्विट करणाऱ्याने हापूर पोलिसांना टॅग केले होते. यापूर्वी याच अकाउंटवरुन मेरठ आणि लखनऊमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमक्याही देण्यात आल्या होत्या. या धमक्यांनंतर निगराणी पथक या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते. निवडणुकीदरम्यान केलेल्या या ट्विटमध्ये ओवेसी हे प्यादे आहेत, खरे लक्ष्य योगी आदित्यनाथ आहेत, भाजप नेत्यांच्या वाहनांवर आरडीएक्स हल्ला करणार, तुमची टीम लावा. दिल्ली पाहू नका. असे लिहिले होते.