Yogi Adityanath : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनऊमध्ये आयोजित एका कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानच्या भविष्याबाबत मोठं विधान केलं आहे. “एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल”, असं म्हणत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी १९४७ मधील महर्षी अरविंद यांच्या एका विधानाचा उल्लेख करत मोठं विधान केलं. यासंदर्भातील भाषणाचा एक व्हिडीओही योगी आदित्यनाथ यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे. तसेच त्यांच्या या विधानाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

तसेच योगी आदित्यनाथ यांनी असंही म्हटलं की, “जर १९४७ मध्ये भारतामधील राजकीय नेतृत्वात प्रबळ इच्छाशक्ती असती तर कोणतीही शक्ती देशाची फाळणी करू शकली नसती. १९४७ मध्ये जे चित्र पाहायला मिळालं होतं, तेच चित्र आज बांगलादेशात पाहायला मिळत आहे. बांगलादेशमधील लोक आज स्वत:ला वाचवण्यासाठी कशापद्धतीने धडपडत आहेत. मात्र, आपला संकल्प आहे की, महर्षी अरविंद यांनी १९४७ आधी एक घोषणा केली होती. देशाच्या स्वातंत्र्यानंतरही त्यांनी चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, अध्यात्मिक जगात पाकिस्तानचे काहीच वास्तव नाही. एकतर पाकिस्तान भारतात विलीन होईल किंवा इतिहासातून कायमचा नष्ट होईल. कारण अध्यात्मिक जगात ज्यांचं काहीच वास्तव नाही. ते नष्टच होणार आहे. त्यामुळे आपणही त्याकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे. आपणही म्हटलं पाहिजे की ते होईल. त्यासाठी आपणही तयार झालं पाहिजे”, असं योगी आदित्यनाथ म्हणाले.

Mauritius FSC remark on Hindenburg Research
Mauritius FSC : हिंडेनबर्गच्या सेबी अध्यक्षांवरील आरोपांवर मॉरिशसची प्रतिक्रिया; म्हणाले, “आमचा देश…”
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Kolkata Doctor Murder
Kolkata Doctor Murder : कोलकात्यातील डॉक्टर तरुणीवर सामूहिक बलात्कार? शवविच्छेदन अहवालानंतर डॉक्टरांचं खळबळजनक वक्तव्य
Captain Deepak Singh was killed during an encounter.
Captain Deepak Singh: अंगावर गोळी झेलूनही दहशतवाद्यांशी लढले, कॅप्टन दीपक शहीद, स्वातंत्र्य दिनापूर्वी भारतमातेने सुपुत्र गमावला
Manu Bhaker says Neeraj is my senior player
Manu Bhaker Neeraj Chopra : ‘माझ्यात आणि नीरजमध्ये…’, मनू भाकेरने लग्नाबाबतच्या चर्चेवर सोडले मौन; म्हणाली, तो मला…
Atal Setu Viral Video
Atal Setu Viral Video : अटल सेतूवर थरार; रेलिंगच्या पलिकडे उतरलेल्या महिलेला पोलिसांनी वाचवलं, जबानीत म्हणाली, “मी तर…”
Muhmmad yunus and narendra modi
Muhammad Yunus : बांगलादेशच्या मुख्य सल्लागारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन, म्हणाले, “बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू…”
Rajiv Kumar on Maharashtra Assembly Election Date Schedule in Marathi
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांचं मोठं विधान, म्हणाले…

हेही वाचा : Manish Sisodia : जामीन मिळाल्यानंतर मनीष सिसोदिया पुन्हा दिल्लीचे उपमुख्यमंत्री बनणार? स्वत: उत्तर देत म्हणाले…

बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं की, “आज सव्वा कोटी हिंदू बांगलादेशमध्ये आपला जीव वाचवण्यासाठी विनवणी करत आहेत. मात्र, जगाचं तोंड बंद आहे. एवढंच नाही तर फुटीरतावाद्यांचंही तोंड बदं आहे. याचं कारण ते कमकुवत आहेत. त्यांना वाटतं की त्यांची व्होट बँक आहे, त्यांना फक्त त्यांच्या व्होटबँकेची चिंता आहे. असं असलं तरी त्यांची संवेदनशीलता संपलेली आहे. सध्या मानवतेचं रक्षण करण्यासाठी त्यांच्या तोंडामधून एक शब्द देखील निघत नाही. याचं कारण म्हणजे स्वातंत्र्यानंतर अशा प्रकारच्या राजकारणाला प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं”, असंही ते म्हणाले.