उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हेलिकॉप्टरला उड्डाणानंतर लगेच जमिनीवर उतरावे लागल्याची घटना घडली आहे. वाराणसीवरून लखनऊला जाताना योगींच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याची माहिती स्थानिक अधिका-यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

योगी सुरक्षित
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विकासकामांचा आढावा घेण्यासाठी वाराणसीत आले होते. वारणसीहून लखनऊकडे परत जाताना योगांच्या हेलिकॉप्टरला पक्षी धडकल्यामुळे हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या अपघातात कोणालाही दुखापत झाली नसून योगी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

जुलै महिन्यात पंतप्रधान मोदींचा वाराणसी दौरा

जुलै महिन्यात पंतप्रधान मोदी वाराणसी दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या या दौऱ्यापूर्वी विकासकामांचा आढावा आणि पाहणी करण्यासाठी योगी आदित्यनाथ दोन दिवसीय वाराणसी दौऱ्यावर होते. शनिवारी सायंकाळी विकासकामांचा आढावा आणि पाहणी केल्यानंतर योगी हेलिकॉप्टरने लखनऊला जात होते. उड्डाणच्या काही वेळातच हेलिकॉप्टर पक्षी धडकल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग करावे लागले.

घटनेची चौकशी
या घटनेची चौकशी करण्यात येत आहे. इमर्जन्सी लँडिंगनंतर पर्याय म्हणून योगींना दुसरे हेलिकॉप्टर पाठवण्यात आले आहे. जेव्हा एखाद्या मंत्र्यासोबत अशा प्रकारची घटन घडते तेव्हा प्रोटोकॉल अंतर्गत हेलिकॉप्टर उतरवले जाते. तांत्रिक पथकाकडून त्या हेलिकॉप्टरची कसून तपासणी केली जाते. सर्वकाही ठिक आहे याची खात्री झाल्यानंतरच हेलिकॉप्टरच्या उड्डाणाची परवानगी दिली जाते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttar pradesh cm yogi adityanaths helicopter emergency landed in varanasi after hitting bird dpj
First published on: 26-06-2022 at 12:49 IST