उत्तर प्रदेश : अनेक केंद्रांवर मतदान यंत्रांत बिघाड; गोंधळाचे वातावरण

Nagpur Lok Sabha seat, Allegations, Missing Voter Names, anti bjp people, Stir Controversy, polling day, polling news, nagpur poliing news, Missing Voter Names in nagpur, nagpur Missing Voter Names,
नागपुरात दडपशाही? भाजपविरोधी भूमिका मांडणाऱ्यांचे मतदार याद्यांमधून नावे गहाळ, मतदार म्हणतात…
Home Voting for Elderly and Disabled Voters, Home Voting Facility Initiated, Home Voting nagpur district, lok sabha 2024, lok sabha phase 1, election 2024, election news,
मतदानापूर्वी गृहमतदान, काय आहे ही पध्दत?‘ हे ’ ठरले प्रथम गृह मतदार
Shramjivi organization
ठाणे : पाणी प्रश्नावरून श्रमजीवी संघटनेचे ग्रामपंचायतींवर मोर्चे, रिकामे हंडे घेऊन अधिकाऱ्यांना विचारला जाब
chipko movement, chipko movement lokrang article
चिपको : हिमालयापासून केरळपर्यंत…

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी ६० टक्के मतदान झाल़े. काही केंद्रांवर मतदान यंत्रांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाल़े  मात्र, किरकोळ अपवादवगळता मतदान शांततेत पार पडल़े

उत्तर प्रदेशातील ११ जिल्ह्यांतील ५८ जागांसाठी गुरुवारी मतदान झाल़े  सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७़ ७९ टक्के मतदानाची नोंद झाली़.  ६ वाजेपर्यंत ६०़ ५१ टक्के मतदान नोंदवण्यात आल़े.  मतदानाची वेळ सायंकाळी सहा वाजता संपली़.  मात्र, त्याआधीच रांगेत असलेल्यांना वाढीव वेळ देऊन मतदानाची परवानगी देण्यात आली, असे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी बी़ डी़ राम तिवारी यांनी सांगितल़े.  त्यामुळे मतदानाची अंतिम टक्केवारी वाढण्याची शक्यता आह़े.

 काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये  बिघाड निर्माण झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या़. त्यानुसार संबंधित मतदान यंत्रे बदलण्यात आली आणि मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली, असे तिवारी  यांनी स्पष्ट केल़े  कैराना मतदारसंघांमधील दुंदूखेडा येथे काही मतदारांना मतदान करण्यापासून रोखण्यात आल्याचा आरोप समाजवादी पक्षाने केला़. याबाबत तेथील निवडणूक अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे तिवारी यांनी सांगितल़े

पहिल्या टप्प्यातील ५८ जागांसाठी ६२३ उमेदवार रिंगणात आहेत़. त्यात ७३ महिलांचा समावेश आह़े.  या टप्प्यात श्रीकांत शर्मा, सुरेश राणा, संदीप सिंह, कपिल देव अग्रवाल, अतुल गर्ग आणि चौधरी लक्ष्मी नरेन या मंत्र्यांचे भवितव्य मतदानयंत्रांत बंद झाल़े.