Uttar Pradesh Ghaziabad Cylinder Blast News : गाझियाबादमध्ये शनिवारी सकाळी एक भीषण दुर्घटना घडली आहे. येथील भोपुरा चौकाजवळ गॅस सिलिंडर्स वाहून नेणाऱ्या ट्रकला मोठी आग लागली आहे. या आगीमुळे ट्रकमधील सिलिंडर्सचे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज दोन ते तीन किलोमीटर दूरपर्यंत ऐकू येत असल्याचं स्थानिकांनी सांगितलं. येथील रहिवाशांनी स्फोटांचा आवाज ऐकून व आगीचे लोळ पाहून अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्याचं काम सुरू केलं. या घटनेचा व्हिडीओ देखील समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. आगीचं हे दृश्य खूप भयावह आहे. त्यामुळे आजूबाजूचे रहिवासी घाबरले आहेत. स्थानिकांनी सांगितलं की सुरुवातीला सिलिंडर स्फोटांचे आवाज येण्यास सुरुवात झाली तेव्हा असं वाटत होतं की बॉम्बस्फोट चालू आहेत. दरम्यान, पोलिसांनी या घटनेची माहिती देताना सांगितलं की ट्रकमध्ये १५० सिलिंडर असण्याचा अंदाज आहे.

ट्रकला आग लागून सिलिंडर्सचे स्फोट झाले. या स्फोटांमुळे आजूबाजूच्या घरांचं नुकसान झालं आहे. ट्रक जिथे उभा होता त्याच्या बाजूलाच अनेक गोदाम होते. यापैकी काही गोदामांचं नुकसान झालं आहे. या स्फोटांचे आवाज इतके भयावह होते की आजूबाजूच्या परिसरातील लोक घराबाहेर पडून मोकळ्या मैदानावर आले. काहींना वाटलं की बॉम्बस्फोट होत आहेत.

Building catches fire in Thane residents escape safely
ठाण्यात इमारतीला आग, रहिवाशांची सुखरूप सुटका
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Fire breaks out at Goregaon furniture market
गोरेगावमध्ये फर्निचर मार्केटमध्ये आग; आगीची तीव्रता आणखी वाढली
Explosion at Chandrapur power station 500 MW unit shut down Power station keeps secrecy
चंद्रपूर वीज केंद्रात स्फोट, ५०० मेगावॉटचा संच बंद; वीज केंद्राकडून गुप्तता…
bhandara blast 8 died
भंडारा आयुध निर्माणीत स्फोट; आठ ठार
Villagers shared their experience after explosion in ordnance manufacturing company Bhandara
जोरदार आवाज झाला, पत्रे उडाले; स्फोटानंतर ग्रामस्थांनी सांगितला अनुभव
Blast in Maharashtra’s Bhandara Ordnance Factory| Explosion at Bhandara Ordnance Factory
Bhandara Ordnance Factory Blast : भंडारा आयुध निर्माण कंपनीत स्फोट; मोठी जीवितहानी? अनेक गावांना हादरे
Jalgaon Railway Accident| Pushpak Pushpak Train Accident Latest Updates
Jalgaon Railway Accident : “आग लागली, आग लागली असा आवाज आणि…”, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला जळगाव रेल्वे अपघाताचा थरार

पोलीस या घटनेचा तपास करत असून आगीचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

Story img Loader