scorecardresearch

“मुस्लीम महिलांचं खुलेआम अपहरण करून…”, कथित महंताचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; पोलीस तपास सुरू!

आजूबाजूला जमलेले नागरिकही त्यांच्या या धमक्यांनंतर उत्साहाने घोषणा देत आहे.

भगवे कपडे परिधान केलेल्या एका व्यक्तीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भगवे कपडे घातलेली ही व्यक्ती मुस्लीम महिलांचं अपहरण आणि त्यांच्यावर बलात्कार करण्याच्या धमक्या देत आहे. आजूबाजूला जमलेले नागरिकही त्यांच्या या धमक्यांनंतर उत्साहाने घोषणा देत आहे.


हा व्हिडीओ आहे उत्तरप्रदेशातल्या सीतापूर भागातल्या मशिदीच्या बाहेरचा. एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, भगवे कपडे परिधान केलेला महंत जीपमध्ये बसला आहे आणि जमावासमोर भाषण देत आहे. हा महंत खैराबाद इथल्या असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये या महंताच्या मागे पोलिसही उभे असल्याचं दिसत आहे.


हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये ही घटना २ एप्रिल रोजी घडली असल्याचं सांगण्यात येत आहे. या व्हिडीओमध्ये भगवे वस्त्र परिधान केलेली व्यक्ती म्हणत आहे की, जर या भागातल्या कोणत्याही हिंदू मुलीला काहीही त्रास झाला तर मुस्लीम महिलांचं अपहरण केलं जाईल आणि सार्वजनिकरित्या त्यांच्यावर बलात्कार केला जाईल. या व्यक्तीच्या अशा वक्तव्यानंतर आजूबाजूला जमलेले नागरिकही जय श्रीराम अशा घोषणा देताना दिसत आहे.


या प्रकरणी सीतापूर पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहे. चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल, असे आदेश सीतापूर पोलिसांनी दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uttar pradesh hatemonger threatens to rape muslim women amid cheers see video vsk

ताज्या बातम्या