scorecardresearch

थरकाप उडवणारी घटना! घरात मांस न आणल्याने पतीने गाठली क्रूरता, तीन मुलांसमोरच पत्नीचा गळा चिरला अन्…

पत्नीचा खून केल्यावर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण परिसरातील नागरिकांनी…

man killed wife
थरकाप उडवणारी घटना! घरात मांस न आणल्याने पतीने गाठली क्रूरता, तीन मुलांसमोरच पत्नीचा गळा चिरला अन्…

उत्तरप्रदेशात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अलीगढ येथे पतीने पत्नीचा गळा चिरून खून केला आहे. घरात मांस आणण्यावरून पती-पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद एवढा विकोपाला गेला की पतीने पत्नीचा खून केला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

अलीगढ येथील रोरावार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील माबुदनगर परिसरात ही घटना घडली. सगीर असे आरोपीचे नाव आहे. तर, गुड्डो असं मृत पत्नीचं नाव आहे. सगीर आणि गुड्डो आपल्या तीन मुलांसह राहत होते.

गुड्डोने सगीरला जेवण बनवण्यासाठी मांस आणण्यास सांगितलं होतं. पण, सगीरने मांस आणलं नाही. त्यावरून पती-पत्नीमध्ये कडाक्याचं भांडण झालं. तेव्हा त्यांची ३ मुलंही घरात होती. दोघांतील वाद एवढा विकोपाला गेला की सगीरने रागात गुड्डोच्या गळ्यावर चाकुने वार केला. यामध्ये गुड्डोचा मृत्यू झाला.

हेही वाचा : वंदे भारत ट्रेन आता ‘स्वर्गा’पर्यंत धावणार, आयफेल टॉवरपेक्षा उंच पूल तयार, रेल्वेमंत्र्यांकडून प्रवासाचा व्हिडीओ शेअर

हा सर्व प्रकार पाहून मुलांनी आरडाओरडा केला. मुलांचा आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. तेव्हा सगीरने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण, सगीरला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. तर, पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

हेही वाचा : राहुल गांधींची खासदारकी गेल्याने विरोधक आक्रमक, संसदेत Black Dress Protest ! सोनिया गांधींचाही सहभाग

याबाबत पोलीस अधिक्षक कुलदीप गुणवत यांनी सांगितलं, “आरोपी सगीरला अटक करण्यात आली आहे. खून करण्यासाठी वापरण्यात आलेलं हत्यार जप्त करण्यात आलं आहे. गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.”

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-03-2023 at 15:04 IST

संबंधित बातम्या