scorecardresearch

दुर्गापूजा मंडपात आरती सुरू असताना भीषण आग; तिघांचा मृत्यू, ५२ जणांवर उपचार सुरू

उत्तर प्रदेशमधील भदोही मधील घटना; आग लागली तेव्हा मंडपात जवळपास १५० जणांची होती उपस्थिती

दुर्गापूजा मंडपात आरती सुरू असताना भीषण आग; तिघांचा मृत्यू, ५२ जणांवर उपचार सुरू
(फोटो सौजन्य- एएनआय)

उत्तर प्रदेशमधील भदोही येथील एका दुर्गापूजा मंडपास आग लागून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेतील मृतांची संख्या आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार तीनवर पोहचली आहे. मृतांमध्ये दोन मुलांचा आणि एका महिलेचा समावेश आहे. अशी माहिती भदोहीचे डीएम गौरांग राठी यांनी दिली आहे.

काल रात्री नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने घटनास्थळी एकच गोंधळ उडाला होता. आग लागल्यानंतर जवळपास २० मिनिटांनी घटनास्थळी अग्निशमन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. यानंतरही बराचवेळ आग आटोक्यात आली नव्हती.

आग शॉर्टसर्किटमुळे लागली असण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आग लागली तेव्हा आरती सुरू होती आणि मंडपात जवळपास १५० जण उपस्थित होते. आगीत होरपळलेल्या ५२ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आगीत होरपळलेल्यांना तातडीने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी एक असणाऱ्या महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या