उत्तर प्रदेशात महापुरुषांच्या जयंती आणि महाशिवरात्रीला मांस विक्रीवर बंदी; योगी सरकारने जारी केले आदेश

अहिंसेचा संदेश देणारे महापुरुष आणि सण लक्षात घेऊन अहिंसा दिन साजरा करण्यासाठी हे आदेश देण्यात आले आहेत

Uttar Pradesh yogi government orders closure slaughterhouse meat shops on shivaratri
(संग्रहित छायाचित्र)

आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेत उत्तर प्रदेशातील योगी सरकारने महापुरुषांच्या जयंती आणि शिवरात्रीनिमित्त राज्यात कत्तलखाने आणि मांसाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. याच अनुषंगाने २५ नोव्हेंबर रोजी सिंधी समाजाचे संत टीएल वासवानी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील कत्तलखाने आणि मांसाची दुकाने बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव रजनीश दुबे यांनी यासंदर्भात सर्व जिल्ह्यांचे विभागीय आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांना आदेश जारी करताना त्याचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

जारी केलेल्या आदेशात नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. रजनीश दुबे यांनी म्हटले आहे की, आज टी.एल. वासवानी यांची जयंती आहे. सर्व शहरी भागात असलेल्या कत्तलखान्यांशिवाय मांस विक्रीची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत. या आदेशाचे काटेकोर पालन करण्याच्या सूचनाही सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

आदेशात म्हटले आहे की, महावीर जयंती, बुद्ध जयंती, गांधी जयंती, महाशिवरात्री आणि टीएल वासवानी यांच्या जयंतीनिमित्त शहरी भागात असलेल्या कत्तलखान्यांव्यतिरिक्त मांसाची दुकाने बंद ठेवण्यात येतील. त्यामागचा तर्क असा आहे की, अहिंसेचा संदेश देणारे महापुरुष आणि सण लक्षात घेऊन त्यांची जयंती अहिंसा दिन म्हणून साजरी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. २०१७ मध्ये सत्तेवर आल्यानंतरच योगी सरकारने बेकायदेशीर कत्तल खान्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती. यासोबतच उघड्यावर मांसविक्रीवरही बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, याआधी मुख्यमंत्री योगींनी मथुरा येथील श्रीकृष्णाच्या जन्मस्थानाचा १० चौरस किमी क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले होते. त्यानंतर तीर्थक्षेत्र परिसरात मद्य व मांसविक्रीवर बंदी घालण्यात आली होती. ब्रजमध्ये येणाऱ्या लाखो भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन योगी सरकारने हा निर्णय

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uttar pradesh yogi government orders closure slaughterhouse meat shops on shivaratri abn

Next Story
चीनमधील भूकंपात ५० ठार, १५० जखमी
ताज्या बातम्या