भीषण दुर्घटना : प्रवासी वाहन दरीत कोसळून १३ जणांचा मृत्यू ; दोन जण जखमी

४०० मीटर खोल दरीत गाडी कोसळली.

उत्तराखंडमध्ये आज (रविवार) एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले. डेहराडून जवळ चकराता येथे एक प्रवासी वाहन ४०० मीटर खोल दरीत कोसळले आणि या दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यू झाला. दोन जण जखमी झाले आहेत.

प्राप्त माहितीनुसार, बायला-पिंगुवा मार्गावरील गावापासून २०० मीटर अंतरावर वाहन चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने प्रवाशांनी भरलेले हे वाहन सुरक्षा भिंत तोडून थेट ४०० मीटर खोल दरीत कोसळले. हा भीषण अपघात सकाळी १० वाजता घडला.

अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळाकडे धाव घेतली व बचाव कार्य सुरू झाले. दरम्यान, एसडीआरएफ, पोलीस आणि प्रशासनाची टीम देखील घटनास्थळी पोहचली आणि बचाव कार्यास वेग आला. दरीत अनेक ठिकाणी मृतदेह पडलेले दिसत होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uttarakhand 13 people died two rescued after a vehicle rolled down a gorge msr

ताज्या बातम्या