उत्तर प्रदेशच्या टेहरी जिल्ह्यातील चंबा भागात एक वाहन खोल दरीत कोसळून झालेल्या अपघातात ११ जण ठार झाले आणि दोघे जखमी झाले अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात झाल्याची माहिती टेहरीच्या जिल्हा न्यायदंडाधिकारी नितिका खंडेलवार यांनी दिली.

मिळालेल्या माहितीनुसार सर्व मृत घणसालीमधील थ्योलधरचे रहिवाली होते. ते हरिद्वारमधील एकाचे अंत्यसंस्कार करून घरी परत जात होते. अपघातग्रस्त वाहनात १० जण होते. आपत्कालीन आणि बचाव पथकाला आठ मृतदेह सापडले असून दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त करून जखमींना योग्य उपचार उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत.