ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी केंद्र सरकारने पुरेशी मदत द्यावी, असे आवाहन उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरिश रावत यांनी केले आहे. शेतकऱ्यांबद्दल आपुलकी दाखविणे म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मान केल्यासारखेच आहे, असेही रावत यांनी म्हटले आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांची स्थिती सुधारावी यासाठी आम्ही बांधील आहोत आणि त्यासाठी केंद्र सरकार मदतीचा हात देईल, अशी अपेक्षा रावत यांनी व्यक्त केली. शेतकऱ्यांचा सन्मान करणे म्हणजेच देशाच्या स्वातंत्र्याचा सन्मान केल्यासारखे आहे, असेही ते म्हणाले.
शेतकऱ्यांची थकबाकी देण्यासाठी केंद्र सरकारने ४०० कोटी रुपये द्यावेत, अशी मागणी रावत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून वसुली करण्यास रावत यांनी बँकांवर र्निबध घातले आहेत.उत्तराखंडच्या अत्यंत दुर्गम अशा डोंगराळ भागांत विकास कार्यक्रम नेण्याला आपल्या सरकारचे प्राधान्य राहील आणि त्यासाठीच अलमोरा येथे मंत्रिमंडळाचीच बैठक घेण्यात आली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.