उत्तराखंड: हेलिकॉप्टर अपघातातील आठ मृतदेहांची अद्याप ओळख पटली नाही

उत्तराखंडमधील मदतकार्यावेळी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातील आठ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही.

उत्तराखंडमधील मदतकार्यावेळी झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातील आठ मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. अपघात झालेल्या हेलिकॉप्टरमध्ये भारतीय वायू दल, इंडो-तिबेटन पोलिस दल आणि एडीआरएफच्या जवानांचा समावेश होता. केदारनाथ पट्ट्याजवळ मदतकार्य करण्यासाठी हेलिकॉप्टर गेले असताना हा अपघात झाला होता. त्यातील आठ मृतदेहांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही आणि आणखी दोघांचा शोध सुरू आहे.  
“या आठ मृतदेहांचा डीएनए घेण्यात आला आहे.  शुक्रवारी डीएनए चाचणी घेणारी टीम हेलिकॉप्टरमध्ये समावेश असलेल्या सैनिकांच्या नातेवाईकांचा डीएनए घेण्यासाठीही टीम रवाना झाली आहे. त्यानुसार ओळख पटविण्यात येईल” असे आयटीबीपीचे अधिकारी अजय चड्डा यांनी सांगितले. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Uttarakhand eight crash victims yet to be identified