करोनावर रुग्णालयांमध्ये होणाऱ्या उपचारांविषयी योगगुरू रामदेव बाबा यांनी केलेल्या विधानांवरून सध्या देशात मोठा वाद निर्माण झाला आहे. इंडियन मेडिकल असोसिएशन अर्थात IMA कडून रामदेव बाबांच्या विधानावर तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी आयएमएनं केंद्र सरकारला पत्र लिहिण्यासोबतच रामदेव बाबा यांच्याविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एकीकडे आयएमएच्या केंद्रीय मंडळाकडून रामदेव बाबांनी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे मागे घेण्याची मागणी केली जात असताना आता उत्तराखंड आयएमएनं थेट रामदेव बाबांनाच खुल्या चर्चेचं आव्हान दिलं आहे. रामदेव बाबांनी डॉक्टरांना उद्देशून जवळपास २५ प्रश्नांची यादीच जाहीर केली होती. त्यानंतर आता उत्तराखंड आयएमएकडून हे आव्हान देण्यात आलं आहे.

 

Sexual abuse of young woman by pretending treatment case filed against self-proclaimed doctor in Nalasopara
उपचाराच्या नावाखाली तरुणीवर लैंगिक अत्याचार, नालासोपार्‍यात स्वयंघोषित वैद्याविरोधात गुन्हा दाखल
Sarbajeet singh
सरबजित सिंगच्या मारेकऱ्याची पाकिस्तानात हत्या; मुलगी म्हणते, “हा न्याय…”
Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले

व्हायरल व्हिडीओमध्ये रामदेव बाबा म्हणाले…

काही दिवसांपूर्वी रामदेव बाबांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर देखील एक हजार डॉक्टर मेल्याचा दावा केला होता. “जे स्वत:ला वाचवू शकत नाहीत, ते कसले डॉक्टर?” असा सवाल देखील ते विचारताना दिसले.

 

“त्यांचा बापही अटक करू शकत नाही”

या व्हिडिओनंतर मोठ्या प्रमाणावर रामदेव बाबांवर टीका होऊ लागल्यानंतर त्यांचा अजून एक व्हिडिओ व्हायरल झाला. यामध्ये, “लोक कधीकधी रामदेवबाबा यांना अटक करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर चालवतात तर कधी रामदेवबाबा ठग असल्याचे ट्रेंड चालवतात. चालू द्या, पण आता आपण हे गुण देखील शिकलो आहोत आणि आम्ही जे लोकं जो ट्रेंड चालवितो तो देखील शीर्षस्थानी असतो. अटक तर त्यांचा बाप सुद्धा करू शकत नाही”, असं म्हणताना दिसले.

 

देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी

या सगळ्या प्रकारामुळे संतप्त झालेल्या डॉक्टरांच्या शीर्ष संघटना आयएमएनं रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस पाठवली. तसेच, आपल्या विधानाबद्दल माफी देखील मागण्यास सांगितलं. इतक्यावरच न थांबता, आयएमएनं योगगुरू रामदेवबाबा यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची देखील मागणी करणारं पत्र थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.

“आमचं त्यांच्याशी वाकडं नाही”

दरम्यान, रामदेव बाबांविरोधात दाखल केलेल्या तक्रारीविषयी बोलताना आयएमएचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. जी. ए. जयलाल यांनी सांगितलं, “आमचं रामदेव बाबांशी काही वाकडं नाही. जर रामदेव बाबा त्यांचं विधान पूर्णपण माघारी घेणार असतील, तर आम्ही आमची तक्रार मागे घेऊ. आम्हाला वाटतं की त्यांची वक्तव्य लोकांमध्ये संभ्रम निर्माण करू शकतात. त्यांचे खूप सारे अनुयायी असल्यामुळे आम्हाला ही भिती वाटते.”

हा माझा नाही, सरकारच्या धोरणांचा दोष; ‘कोरोनील’वर बाबा रामदेव यांनी दिलं उत्तर

या सर्व पार्श्वभूमीवर आता उत्तराखंड आयएमएनं रामदेव बाबांना खुल्या चर्चेचं आव्हान दिल्यामुळे त्यांच्याडून काय पाऊल उचललं जाणार, हे महत्त्वाचं ठरणार आहे.