करोनाची दहशत… भारतातील ‘या’ प्रांतात महिन्याभरात विकल्या गेल्या पाच कोटी पॅरासिटामॉल

करोनावरील उपचारांसाठी लागणाऱ्या औषधांचा तुटवडा निर्माण झालाय

paracetamol
प्रातिनिधिक फोटो (सौजन्य : विकीपिडिया कॉमन्स)

करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये औषधांची मागणी वाढली आहे. अनेक राज्यांमध्ये करोनाचे रुग्ण वाढत आहेत त्याबरोबरच औषधांची मागणीही वाढताना दिसत आहे. उत्तराखंडमधील कुमाऊ प्रांतामध्ये मागील काही काळापासून सातत्याने करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने येथे एका महिन्यात तब्बल पाच कोटी पॅरासिटामॉल गोळ्यांची विक्री झाल्याची माहिती समोर येत आहे. तर करोनावर उपाचारासाठी वापरण्यात येणाऱ्या एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांच्या विक्रीचे आकडे दोन कोटींहून पुढे गेलेत.

उत्तराखंडमध्ये एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यापासून करोनाबाधितांची संख्या वाढू लागली आणि औषधांची विक्रीही वाढली. अनेक ठिकाणी लोकांना आगाऊमध्येच औषधं घेऊन ठेवल्याचंही दिसून आलं. येथील ऊधमसिंह नगर आणि हल्द्वानी येथून डोंगळार भागांमध्ये औषधांचा पुरवठा केला जातो. अनेक डॉक्टर करोना रुग्णांसाठी एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन औषधच लिहून देत आहेत. तसेच अनेक ठिकाणी साडेसहाशे एमजी पॅरासिटामॉल गोळी घेण्याचाही सल्ला डॉक्टर देत आहेत. तसेच बी कॉम्पलेक्स, झिंकबरोबरच, क जीवनसत्व आणि आइवरमेक्टिनच्या गोळ्याही लिहून दिल्या जात आहेत.

बी कॉम्पलेक्स झिंकबरोबरच क जीवनसत्वाच्या दोन दोन कोटी गोळ्यांची विक्री झालीय. त्याबरोबरच आइवरमेक्टिनच्या ५० लाख किंमतीच्या गोळ्या विकल्या गेल्यात. कुमाऊंमध्ये ड जीवनसत्वाची पाकिटं आणि गोळ्यांची पाच लाखांच्या आसपास विक्री झालीय. श्वसनासंदर्भातील त्रासांसाठी इन्हेलरचा वापर करण्याचा सल्लाही डॉक्टर देत असल्याने त्याचीही विक्री वाढलीय.

करोना रुग्णांवरील उपचारादम्यान रक्त पातळ करणारं इंजेक्शन दिलं जातं. मात्र या इंजेक्शनची आता कमतरता उत्तराखंडमधील कुमाऊंमध्ये जाणवू लागलीय. त्याचबोरबरच एजिथ्रोमायसिन आणि डॉक्सीसाइनक्लिन या गोळ्यांचीही कमतरता जाणवू लागली आहे. करोनावरील उपाय म्हणून रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरण्यात येणारी आयुर्वेदिक औषध आयुष ६४ आणि पतंजलीच्या कोरोनिल गोळ्याही बाजारात उपलब्ध नाहीयत.

केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रग्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी अमर उजालाशी बोलताना, “पॅरासिटामॉल आणि अ‍ॅण्टीबयोटिक गोळ्यांची मागणी वाढलीय. पॅरासिटामॉलचे जवळजवळ चार ते पाट कोटी आणि दोन दोन कोटी अ‍ॅण्टीबायोटिक गोळ्यांची विक्री झालीय. त्याबरोबरच जीवनसत्व क, जीवनसत्व ड आणि बी कॉम्पलेक्सबरोबरच झिंकच्या गोळ्यांचीही मागणी वाढलीय,” असं सांगितलं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Uttarakhand sudden increases in patients recorded 5 crore paracetamol sold in a month scsg

Next Story
शांत व आरोग्यदायी झोपेसाठी सेंद्रिय बिछाना
ताज्या बातम्या