उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका महिलेने दत्तक घेतलेल्या सात वर्षीय चिमुकलीवर अमानुष अत्याचार केला आहे. मुलीला कुकर आणि इस्त्रीचे चटके देण्यात आले आहेत. तसेच, तिचा हातही मोडण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला आणि तिच्या पतीला अटक केली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
काही वर्षापूर्वी आरोपी महिलेने एका मुलीला दत्तक घेतलं होतं. ही महिला मुलीकडून घरातील काम करून घेत असतं. कामात काही चूक झाली, तर तिच्यावर अत्याचार करत असत. शनिवारी ( १८ मार्च ) जखमी अवस्थेत मुलीला रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तेव्हा महिलेने खेळताना तिचा हात मोडल्याचं डॉक्टरांना सांगितलं. पण, मुलीची परिस्थिती पाहून डॉक्टरांनी तपासणी केली असताना धक्कादायक खुलासे झाले.
हेही वाचा : …अन् बलात्कार प्रकरणातील आरोपी निघाला नपुंसक; उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, नेमकं काय घडलं?
डॉक्टांना मुलीच्या शरीरावर चटके दिल्याचे व्रण आढळून आले. तसेच, मुलीच्या गुप्तांगात डॉक्टरांना लाकूड आढळून आलं. त्यानंतर डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली.
कानपुरची राहणारी आहे मुलगी
पोलिसांनी चौकशी केली असता, ही मुलगी कानपूरची राहणारी असल्याची माहिती समोर आली. तिच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. मग, आरोपी महिलेने तिला दत्तक घेतलं होतं. ही मुलगी धूमनगंज पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या प्रीतम नगर येथे ४ महिन्यांपासून या महिलेबरोबर राहत होती.
हेही वाचा : सरकारी वकिलांचा युक्तिवाद संपुष्टात; २५ मार्चपासून आफताबचा प्रतिवाद सुरू
याबाबत धूमनगंज पोलीस ठाण्याचे अधिकारी राजेश कुमार मौर्य यांनी सांगितलं की, “आरोपी महिला अंजना सिन्हा आणि पती अरूण कुमार सिन्हा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. मुलीची परिस्थिती गंभीर असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहे.