UP Crime News Man allowed friends to rape wife : उत्तर प्रदेशमधील बुलंदशहर येथे महिलेवर झालेल्या अत्याचाराचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. येथील एक ३५ वर्षीय महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. महिलेने गेल्या तीन वर्षांपासून पैशाच्या बदल्यात आपल्या पतीने त्याच्या मित्रांना बलात्कार करू दिला. इतकेच नाही तर पती सौदी अरेबिया येथे बसून या अत्याचाराचे व्हिडीओ पाहात असे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पीडित महिला ही सध्या एक महिन्याची गरोदर असून तिने सांगितले की, तिचे बुलंदशहर येथील गुलाओठी येथील व्यक्तीशी २०१० मध्ये लग्न झाले आणि तिला चार मुले देखील आहेत. ज्यापैकी दोन मुले (वय १३ आणि तीन) आणि दोन मुली (वय ११ आणि ७) आहेत. तिचा नवरा सौदी अरेबियामध्ये ऑटोमोबाईल मेकॅनिक म्हणून काम करतो आणि वर्षातून एक-दोनदा घरी येतो.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, तिचा नवरा तीन वर्षांपूर्वी दोन मित्रांबरोबर घरी आला आणि त्याने मित्रांना महिलेवर बलात्कार करू दिला. हे दोघेही बुलंदशहर येथच राहातात आणि पती परदेशात असताना नेहमीच ते तिच्यावर आत्याचार करतात आणि त्याचे व्हिडीओ देखील रेकॉर्ड करतात. जेव्हा महिलेने आपल्या पतीला याबद्दल सांगितलं तेव्हा त्यांने आपल्याला पैसे मिळाल्याचे सांगत महिलेला गप्प राहण्यास सांगितलं.

हेही वाचा>> Delhi Election : टीएमसी, सपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेनेही सोडला काँग्रेसचा हात… दिल्ली निवडणुकीत ‘आप’ला जाहीर केला पाठिंबा

महिलेचा पती सौदी अरेबिया येथे बसून मोबाइल फोनमध्ये व्हिडीओ पाहातो. त्याने घटस्फोट देण्याची धमकी दिल्याने, मी मुलांकडे पाहून गप्प राहिले, असेही पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी महिलेने तिच्या कुटुंबियांबरोबर बुलंदशहर येथील एसपी श्लोक कुमार यांची भेट घेत तक्रार दाखल केली. यानंतर गुरूवारी एसपींनी तक्रार मिळाली असून तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे. “प्रकरण तीन वर्ष जुने असल्याने स्थानिक पोलिसांकडून याची कसून तपास केला जाईल आणि आवश्यक ती कारवाई केी जाईल”, असे कुमार यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Utter pradesh man allowed friends to rape wife for money watched videos from saudi crime news rak