लसीकरण झालेले लोक पसरवू शकतात करोनाचा डेल्टा व्हेरिएंट

वर्षभराच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. 

गुरुवारी एका ब्रिटिश अभ्यासात असे दिसून आले आहे की करोनाव्हायरस विषाणूचा डेल्टा प्रकार लसीकरण केलेल्या लोकांपासून त्यांच्या जवळच्या संपर्कांमध्ये सहजपणे पसरू शकतो. वर्षभराच्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे. 

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनमधील ६२१ लोकांवर वर्षभर चाललेल्या अभ्यासानंतर हा खुलासा समोर आला आहे. द लॅन्सेट इन्फेक्शियस डिसीज मेडिकल जर्नलमध्ये गुरुवारी प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे की, अभ्यासामध्ये कोविडची सौम्य लक्षणे असलेल्या ६२१ लोकांचा समावेश आहे. शास्त्रज्ञांना अभ्यासात असे आढळून आले की लसीकरण करूनही संसर्गाचा धोका आहे. अभ्यासात असेही आढळून आले आहे की लसीकरण केलेल्या लोकांपैकी २५ टक्के लोकांच्या संपर्कात आलेल्या लोकांना करोनाची लागण झाली आहे, तर लसीकरणाशिवाय लोकांच्या संपर्कात आलेल्या सुमारे ३८ टक्के लोकांना संसर्ग झाला आहे. 

लसीकरण झालेल्यांमध्ये संसर्गाची सौम्य लक्षणे होती, तर ज्यांचे लसीकरण झाले नाही, त्यांच्या संपर्कात आलेल्या संक्रमित लोकांची प्रकृती बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले, असेही अभ्यासात म्हटले आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की केवळ लसीकरण डेल्टा प्रकाराचा संसर्ग टाळू शकत नाही.मात्र, लस घेतल्यानंतर संसर्गाचा प्रभाव कमी होतो आणि तो धोकादायक पातळीपर्यंत पोहोचत नाही. इम्पीरियल कॉलेज, लंडनचे प्राध्यापक अजित लालवानी यांनी या अभ्यासाचे सह-नेतृत्व केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vaccinated people can spread the delta variant of corona information in the study srk

ताज्या बातम्या