तैपैई : चीनमध्ये करोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होत असताना तीन वर्षांपुढील मुलांचेही करोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. आतापर्यंत ७६ टक्के लोकांचे लसीकरण झाले असून आता करोनाच्या बाबतीत अधिक कठोर उपाययोजना करण्यात येत आहेत.

स्थानिक शहरे व प्रादेशिक पातळीवरील प्रशासनाने याबाबत अधिसूचना जारी केल्या असून तीन ते अकरा वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. चीनने काही ठिकाणी कमी प्रमाणात झालेल्या करोनाच्या प्रसाराला पायबंद घालण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. वायव्येकडील गान्सू प्रांतात पर्यटन उद्योग मोठय़ा प्रमाणावर आहे. तेथे सोमवारी करोनाचे नवीन रुग्ण सापडल्यानंतर पर्यटन स्थळे बंद करण्यात आली आहेत. मंगोलियाच्या अंतर्गत  भागात गेल्या २४ तासांत ३५ नवीन रुग्ण सापडले आहेत. इतर रुग्ण देशात विविध ठिकाणी विखुरलेले आहेत. करोनाच्या साथीच्या काळात चीनने मोठय़ा प्रमाणावर टाळेबंदी, विलगीकरण, सक्तीच्या चाचण्या हे मार्ग अवलंबले होते. १.४ अब्ज लोकांपैकी अनेक लोकांचे लसीकरण करण्यात आले असून डेल्टा विषाणूच्या प्रसाराबाबत सरकारला विशेष चिंता आहे. सिनोफार्म व सिनोव्हॅक या लशींचा चीनमध्ये मोठय़ा प्रमाणात वापर सुरू असून डेल्टा विषाणूविरोधात या लशी कितपत प्रभावी आहेत हे अजून स्पष्ट झालेले नाही. अधिकाऱ्यांनी मात्र लशींमुळे संरक्षणाचा दावा केला आहे. हुबेई, फुजियान, हैनान प्रांतात सूचना जारी करण्यात आल्या असून झेजियांग प्रांत व हनान प्रांतात खबरदारीचे आदेश देण्यात आले आहेत. चीनने सिनोफार्म व सिनोव्हॅक या लशींना मान्यता दिली होती. आता ३-१७ वयातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सध्या १२ वर्षांवरील मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. ऑगस्टमध्ये सिनोफार्मने तयार केलेल्या लशीला मान्यता देण्यात आली होती. कंबोडियात ६-११ वयोगटात सिनोव्हॅक व सिनोफार्मच्या लशी वापरल्या जात आहेत. चिलीत वर्षांवरील मुलांसाठी तर अर्जेटिनात ३  वर्षांवरील मुलांसाठी लशींचा वापर केला जात आहे.

mutual fund, market, investment, Assets, small cap
स्मॉल कॅप फंडांमधील मालमत्ता २.४३ लाख कोटींवर
sun and jupiter conjunction in aries
१२वर्षांनंतर झाली सूर्य आणि गुरुची युती! या राशींचा सुरु होईल सुवर्णकाळ! मिळेल अमाप पैसा
use molds 40 years ago on manufacturers for sugar gathi Pune
साखर गाठीसाठी नवे साचे मिळेनात; उत्पादकांवर ४० वर्षांपूर्वीचे साचे वापरण्याची वेळ
Xiaomi SU7 EV Launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, २४ तासांत धडाधड विकली गेली ‘ही’ इलेक्ट्रिक कार, किंमत…