अमेरिकेकडून जूनअखेर भारताला लसपुरवठा

जगभरात जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी लसमात्रांचे वाटप करण्याचे अमेरिकेचे धोरण आहे.

नरेंद्र मोदी आणि कमला हॅरिस यांच्यात चर्चा

भारतासह अन्य देशांना जूनअखेरपर्यंत करोना प्रतिबंधक लसपुरवठा करणार असल्याचे अमेरिकेने गुरुवारी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर अमेरिकी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लससहकार्याबद्दल आभार मानल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

जगभरात जूनअखेरपर्यंत किमान आठ कोटी लसमात्रांचे वाटप करण्याचे अमेरिकेचे धोरण आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात २.५ कोटी लसमात्रांचा पुरवठा भारतासह काही देशांना करण्यात करण्याचे अमेरिकेचे नियोजन आहे.

अमेरिकेच्या या लसहकार्याबाबत पंतप्रधानांनी अनेक ट्विट संदेश प्रसृत केले. अमेरिकी उपाध्यक्ष कमला हॅरिस यांच्याशी चर्चा करून लसपुरवठ्याबाबत अमेरिकी सरकारचे आभार मानले. करोनोत्तर काळात जागतिक आरोग्य क्षेत्रातील भागिदारी, अर्थव्यवस्थेची फेरउभारणी आदी मुद्यांवरही यावेळी चर्चा केल्याचे मोदी यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Vaccine supply u s vice president kamala harris prime minister narendra modi akp

ताज्या बातम्या