नवी दिल्ली : भाजपप्रमाणे काँग्रेसमध्येही संघटनात्मक बदलाची सुरुवात झाली असून शुक्रवारी मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदी भाई जगताप यांच्या जागी आमदार व माजी मंत्री वर्षां गायकवाड यांच्या नियुक्तीची घोषणा संघटना महासचिव के. सी. वेणुगोपाल यांनी केली. गुजरात व पुडुचेरीचेही प्रदेशाध्यक्ष बदलण्यात आले आहेत.
काँग्रेसची सर्वोच्च निर्णय समिती असलेल्या नव्या कार्यकारिणीची स्थापना करण्यापूर्वी विविध राज्यांमधील प्रदेशाध्यक्ष तसेच प्रभारी बदलाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ‘एकला चलो’चा आग्रह धरणारे भाई जगताप यांची उचलबांगडी करून पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी महाविकास आघाडीला पूरक बदलाचे संकेत दिल्याचे मानले जात आहे.
राज्यातील या बदलामुळे पुन्हा प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी विजय वड्डेटीवार वगैरे नेत्यांनी दिल्ली दौरा करून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याविरोधात केंद्रीय नेतृत्वाकडे तक्रार केल्याचे सांगितले जाते. दोन दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण
गुजरातमध्ये काँग्रेस
अन्य राज्यांतही बदलाचे वारे
आता राजस्थान, पश्चिम बंगाल, दिल्ली, झारखंड या राज्यांतही प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाचे संकेत देण्यात आले आहेत. पुडुचेरीमध्ये ए. व्ही. सुब्रमणियन यांच्या जागी व्ही. वैतीिलगम यांची प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती करून तामीळनाडूमधील बदलाची शक्यता दिसू लागली आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यातील विस्तव जात नसल्याने संपूर्ण प्रदेश समिती बदलली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पायलट नवा पक्ष स्थापन करण्याची जोरदार चर्चा सुरू असली तरी, तशी शक्यता वेणुगोपाल यांनी शुक्रवारी फेटाळली.
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Varsha gaikwad becomes first woman president of mumbai congress mumbai print news zws