लोकसभा निवडणुकीदरम्यान २००९ मध्ये द्वेषमूलक वक्तव्य केल्याप्रकरणी दाखल झालेल्या खटल्यातून येथील स्थानीय न्यायालयाने बुधवारी भाजपचे खासदार वरुण गांधी यांची निर्दोष मुक्तता केली.
मार्च, २००९ मध्ये दालचंद्र वसाहतीतील प्रचारसभेत आपल्या भाषणादरम्यान द्वेषमूलक वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली येथील कोतवाली पोलीस ठाण्यात वरुण गांधी यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली होती. मुख्य न्यायदंडाधिकारी अब्दुल कय्यूम यांनी त्यांना यातून निर्दोष मुक्त केले.
वरुण गांधी यांच्या विरोधात या संबंधात एकूण दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. पिलीभीत जिल्ह्य़ात बाखेरा पोलीस ठाण्यात दुसरी तक्रार दाखल करण्यात आली होती. या दुसऱ्या खटल्यावरील सुनावणी १ मार्च रोजी होणार आहे. जिल्ह्य़ातील तुरुंगाबाहेर घडलेल्या हिंसाचारासंदर्भात अन्य आणखी एक खटला वरुण गांधीविरोधात दाखल करण्यात आला असून तो सत्र न्यायालयाकडे वर्ग करण्यात आला आहे.