अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उत्तर प्रदेश सरकारने तातडीने विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांची सोमवारी दुपारी सुटका केली. २४ तासांपेक्षा जास्त वेळ अटकेत ठेवण्यात आले असेल, तर सिंघल यांच्यासह प्रवीण तोगडिया, जगदगुरू रामभद्राचार्य यांची सुटका करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी दुपारी दिले होते. त्यानंतर काही वेळातच सिंघल यांची सुटका करण्यात आली. 
विश्व हिंदू परिषदेच्या परिक्रमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर रविवारी सकाळी सिंघल यांना लखनौ विमानतळावर अटक करण्यात आली होती. त्याचबरोबर प्रवीण तोगडिया यांनाही अयोध्येतून ताब्यात घेण्यात आले होते.
… तर अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया यांची तातडीने सुटका करा – उच्च न्यायालय