प्रभास आणि सैफ अली खान यांची मुख्य भूमिका असलेला आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या चित्रपटात प्रभू रामचंद्र तसेच रावणाच्या पात्रावर आक्षेप नोंदवण्यात आला आहे. हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका भाजपाचे नेते राम कदम यांनी घेतली आहे. तर आमचा या चित्रपटाला पाठिंबा असेल, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. असे असताना दिग्दर्शक ओम राऊत यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, असा पवित्रा विश्व हिंदू परिषदेने घेतला आहे. विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते श्रीराज नायर यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. ते ‘एबीपी माझा’शी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> भाजपाने विरोध केलेल्या ‘आदिपुरुष’ सिनेमाला मनसेचा जाहीर पाठिंबा, म्हणाले “हे राम कदम आणि हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे…”

विश्व हिंदू परिषदेची स्थापना मुंबईतच झालेली आहे. या ६० वर्षांत विश्व हिंदू परिषदेने चित्रपट, जाहिराती यावर कधीही टिप्पणी केलेली नाही. मात्र मागील काही काळापासून चित्रपट क्षेत्रातील एका वर्गाकडून हिंदू देवदेवतांवर टीका तसेच हिंदू आचार-विचार, साधू यांची खिल्ली उडवली जात आहे. आदिपुरूष चित्रपट अद्याप प्रद्रशित झालेला नाही. या चित्रपटाचा फक्त टीझर आलेला आहे. मात्र या चित्रपटाचा टीझर पाहून अनेक लोकांनी आक्षेप व्यक्त केला आहे. हे टीझर पाहून आमच्याही मनात काही प्रश्न उपस्थित झाले आहेत. चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, लेखकांनी लोकांच्या भावनेशी खेळू नये. त्यांनी तत्काळ आपली भूमिका जाहीर करायला हवी. सध्या सुरू असलेल्या वादावर दिग्दर्शक ओम राऊत यांनी स्पष्टीकरण द्यायला हवं, अशी आमची मागणी आहे, असे श्रीराज नायर यांनी सांगितले.

हेही वाचा >>> राम मंदिराचं ५० टक्के काम पूर्ण – योगी आदित्यनाथांची माहिती

याआधी चित्रपटांमध्ये काही दुरुस्त्या सुचवायच्या असतील तर त्या विश्व हिंदू परिषदेने अत्यंत प्रेमळपणे सूचवलेल्या आहेत. या चित्रपटात भगवान श्रीराम यांच्या पात्रावर वाद आहे. व्हिएफएक्स तसेच तंत्रज्ञानाच्या नावाखाली पौराणिक कथांचे महत्त्व कमी केले जाऊ शकत नाही, अशीही भूमिका विश्व हिंदू परिषदेने घेतली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vhp vishwa hindu parishad stand on adipurush film demand director to clarify prd
First published on: 07-10-2022 at 15:23 IST