कोलकाता विमानतळावर परदेशी चलनाच्या जप्तीसंबंधी एक चक्रावून टाकणारी घटना समोर आली आहे. कोलकाता विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँकॉकला जाणाऱ्या सामानाची तपासणी केली असता, गुटखाच्या पुड्यांमध्ये तब्बल ४० हजार अमेरिकन डॉलर (३२७८००० रुपये) आढळून आले.

सीमाशुल्क विभागाने या कारवाईचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. ज्यामध्ये गुटखाच्या छोट्या पुड्यांमध्ये अमेरिकन डॉलर्सच्या नोटा घडीकरून टाकण्यात आलेल्या होत्या. या पुड्या फोडून त्यातून ही रोकड जप्त करण्यात आली. एवढी मोठी रक्कम अशाप्रकारे नेली जात असल्याचे पाहून कस्टम अधिकारीही चक्रावले होते.

Thane Police Arrests, Interstate Thief Operating, Between Assam and Mumbai, Solves 22 Cases, theft of assam, thane theft, navi mumbai theft, mumbai theft, aeroplane, marathi news, crime news, robbery news,
चोरीसाठी विमानाने मुंबईचा प्रवास, नागालँड आसाम मधील चोरट्याला अटक
series of tremors Navi Mumbai
शहरात हादऱ्यांची मालिका सुरूच, नवी मुंबई महापालिका आयुक्तांच्या बदलीनंतर नगररचना विभागही सुस्त
Redevelopment Delays, Santacruz and Vile Parle, Slums, 80 thousand Await, Rehabilitation , North Central Mumbai Lok Sabha, Constituency, marathi news,
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी ठोस धोरणाचा अभाव
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा

मागील काही दिवसांत कोलकातामध्ये परदेशी चलनाशी संबंधित अनेक प्रकरणं समोर आली आहेत. मात्र असे पहिल्यांदाच घडले आहे की, गुटखाच्या पुड्यांमधून परदेशी चलन जप्त करण्यात आले.

यासंदर्भात सीमाशुल्क विभागाने सांगितल्यानुसार, गुप्त माहितीच्या आधारावर कारवाई करून AIU अधिकाऱ्यांनी इमिग्रेशन औपचारिकतेनंतर ८ जानेवारी रोजी बँकॉकला रवाना होणाऱ्या सामानाची तपासणी केली, असताना गुटखाच्या पुड्यांमध्ये लपवलेले ४० हजार अमेरिकन डॉलर आढळले, जे की जप्त करण्यात आले आहे.