अमेरिका-रशियात अजब सौदा! बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने 'मृत्यूच्या व्यापाऱ्याला' सोडलं; विमानतळावरील Video Viral | Brittney Griner now free from Russian custody following prisoner swap with arms dealer Viktor Bout scsg 91 | Loksatta

अमेरिका-रशियात अजब सौदा! बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral

अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनीही यासंदर्भातील माहिती व्हाइट हाऊसमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली

अमेरिका-रशियात अजब सौदा! बास्केटबॉलपटूच्या मोबदल्यात अमेरिकेने ‘मृत्यूच्या व्यापाऱ्याला’ सोडलं; विमानतळावरील Video Viral
Brittney Griner Viktor Bout: आबुधाबी विमानतळावर झाली अदलाबदली (फोटो व्हिडीओवरुन स्क्रीनशॉट)

Brittney Griner Viktor Bout Swap Video: अमेरिका आणि रशियादरम्यान एक अनोखा सौदा झाला आहे. एका आरोपीच्या मोबदल्यात दुसऱ्या आरोपीला सोडण्याचा सौदा या दोन्ही राष्ट्रांमध्ये झाला असून अमेरिकेने राशियाच्या ताब्यात असलेल्या महिला बेसबॉलपटूला सोडवण्यासाठी रशियाची आणि पर्यायाने व्लादिमीर पुतीन मागणी मान्य केली आहे. ऑलम्पिक सुवर्णपदक विजेती ब्रिटन ग्राइनरला रशियाच्या तावडीतून सोडवण्यासाठी अमेरिकने एका धोकादायक व्यक्तीला रशियाकडे सुपर्द केलं आहे. विक्टर बाउट असं या व्यक्तीचं नाव असून तो हत्यारांचा व्यापारी आहे. विक्टरची ओळख मृत्यूचा व्यापारी (मर्चंट ऑफ डेथ) अशी आहे. व्हाइट हाऊसकडून जारी करण्यात आलेल्या पत्रकामध्ये ब्रिटनीला रशियाच्या कैदेतून सोडवण्यात आलं असून ती लवकरच मायदेशीर परतणार आहे असं म्हटलं आहे.

एखाद्या चित्रपटामधील दृष्य वाटावे अशापद्दथीने ब्रिटनी आणि विक्टर या दोघांची देवाण-घेवाण आबूधाबी विमानतळावर झाली. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी यासंदर्भातील माहिती देताना हत्यांरांचा व्यवसाय करणारा रशियन नागरिक असलेल्या विक्टर बाउटला सोडण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. या मोबदल्यात रशियाने ग्राइनरला अमेरिकेच्या ताब्यात दिलं. ग्राइनर मागील दहा महिन्यांपासून रशियाच्या ताब्यात होती. ग्राइनरला अमेरिकेच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर बायडन यांनी तिच्याशी चर्चा केल्याचं त्यांनीच सांगितलं. काही वेळापूर्वीच मी ग्राइनरशी चर्चा केली. ती सुरक्षित आहे. ती सध्या विमानत असून लवकरच घरी येत आहे. युद्धादरम्यान रशियाने कैद केलेली ग्राइनर लवकरच तिच्या कुटिंबियांबरोबर असेल. मागील बऱ्याच काळापासून आपण सारे या दिवसाची वाट पाहत होतो. आम्ही कधीच ग्राइनरच्या मुक्तेतेसंदर्भातील प्रयत्न थांबवले नव्हते आणि त्याचेच फळ आज मिळाले, असं बायडन म्हणाले.

रशियामधून ३२ वर्षीय ग्राइनरला संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये आणण्यात आलं. त्यानंतर ग्राइनर आणि विक्टर यांची आबूधाबी विमानतळावर अदलाबदली करण्यात आली. दोन्ही देशांकडून प्रत्येकी एक खासगी विमान यासाठी विमानतळावर पाठवण्यात आलं होतं. आपआपल्या देशातील अधिकाऱ्यांबरोबर हे दोघेही मायदेशी परतले. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता आणि महिला एनबीएमधील सक्रीय खेळाडू असलेल्या ग्राइनरला १७ फेब्रुवारी रोजी मॉस्को विमानतळावर रशियन अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं होतं. यानंतर आठवड्याभरात युक्रेनविरुद्ध रशिया युद्ध सुरु झाल्याने अमेरिका आणि रशियातील संबंध कामलीचे ताणले गेल्याने ग्राइनर रशियात अडकून पडली. तेव्हापासूनच तिला मुक्त करण्यासाठी अमेरिकेचे प्रयत्न सुरु होते.

ग्राइनर ही समलैंगिक आहे. तिला रशिया-युक्रेन युद्धाच्या काही दिवस आधीच अटक करण्यात येण्यामागील कारण ठरलं अंमली पदार्थ बाळगणे. अंमली पदार्थांसहीत प्रवास करत असल्याच्या आरोपाखाली ग्राइनरला फेब्रुवारी महिन्यात विमानतळावरच अटक करण्यात आली. मात्र अमेरिकेने या अटकेचा विरोध करताना हे पदार्थ अमेरिकेमध्ये अंमली पदार्थ मानले जात नाही असं म्हटलं होतं. रशियामध्ये या पदार्थांना अंमली पदार्थांचा दर्जा असल्याने ग्राइनरला अटक झाली आहे. रशियामध्ये ग्राइनरविरोधात खटला चालवून तिला ९ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेदरम्यान ग्राइनरला दिवसातील १० ते १२ तास काम करावं लागणार होते. मात्र आता ग्राइनरची सुटका करण्यात आल्याने तिची या सर्वामधून मुक्तता झाली आहे.

एका रशियन मंत्र्याने दिलेल्या माहितीनुसार ग्राइनरला सोडवण्यासाठी मागील आठवड्यामध्ये नव्याने चर्चेला सुरुवात झाली. अमेरिकेने सार्वजनिकरित्या हे सुरुवातील मान्य केलं नाही. मात्र गुरुवारी व्हाइट हाऊसने जारी केलेल्या पत्रकामध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली २०१८ पासून अमेरिकेतील तुरुंगामध्ये कैद असलेल्या बाउटच्या मोबदल्यात ग्राइनरला सोडण्याची तयारी रशियाने दाखवली. बाउट हे पूर्वी सोव्हिएत लष्करामध्ये लेफ्टिनंट पदावर कार्यारत होते. त्यांना शस्त्रविक्रीसंदर्भातील आरोपांअंतर्गत अटक करण्यात आली होती.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-12-2022 at 10:03 IST
Next Story
मुस्लीम पुरुषांच्या एकापेक्षा जास्त पत्नी असल्यास…; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान