गोवा विमानतळावरील एक भन्नाट व्हिडिओ सध्या सोशल नेटवर्किंग साइटवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये भारतीय नौदालतील हवाई दलामधील मिग २९ के आणि लॅम्बॉर्गिनी गाडी वेगाशी स्पर्धा करताना दिसतात. भारतीय नौदलाच्या हवाई तुकडीचा एअरबेस असलेल्या डाबोलीम विमानतळावरील या व्हिडिओमध्ये मिग २९ के हवेत झेपावण्याआधी धावपट्टीवर लॅम्बॉर्गिनी हरिकेन या सुपर कारशी स्पर्धा करताना दिसते. मिळालेल्या माहितीनुसार भारतीय नौदालतील हवाई खात्यातील उच्च अधिका-यांच्या परवानगीनंतर हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे. भारतीय हवाई दलाकडे तरूणांचे लक्ष वेधून घेण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या एका कॅम्पेनचा भाग म्हणून ही वेगळ्या प्रकारची शर्यत आयोजित करण्यात आली होती. या कॅम्पेनबद्दल ऑटोमोबाईल मॅगझिनमध्ये भारतीय नौदलाच्या हवाई तुकडीत असणारे लडाऊ विमाने आणि सुपर कार्स यांच्यासंदर्भातील विशेष लेख छापण्यात येणार असल्याचे समजते. या वर्षाच्या शेवटी डिसेंबरमध्ये ‘नेव्ही विक’दरम्यान हा व्हिडीओ औपचारिकरित्या भारतीय नौदलाकडून प्रदर्शित करण्यात येईल. टाइम्स ऑफ इंडियामधील रिपोर्टर नुसार तरूणांना वैमानिक भरतीसंदर्भात अशा विशेष जाहिरातींच्या माध्यमातून आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेगाचे प्रचंड वेड असणाऱ्या तरूणांना जेट विमानाच्या वेगासमोर सुपर कार्सही फिक्या पडतात असंच या व्हिडिओतून दाखवण्याचा उद्देश असल्याचे व्हिडिओ पाहिल्यावर लक्षात येते. हा व्हिडीओ भारताचे निवृत्त एअर मार्शल अनिल चोप्रा यांनी ट्विट केला आहे. Lamborghini racing MiG 29 at Dabolim Goa pic.twitter.com/2V2HKVKwVs — Aviator Anil Chopra (@Chopsyturvey) August 4, 2018 याच वर्षी जानेवारी महिन्यामध्ये नौदलाच्या टायर स्कॉडमधील एक मिग २९ के हे लढाऊ जेट गोव्यातील विमानतळावरील धावपट्टी वरून टेक ऑफ घेताना खाली उतरले होते. या विमानातील वैमानिकांने वेळेत विमानातून 'इजेक्ट' पर्याय वापरून पॅरेशूटच्या सहाय्याने स्वत:ची सुटका करून घेतल्याने त्याचा जीव वाचला. या अपघातानंतर गोव्यातील विमानतळावरील या विमानाची सर्व ऑपरेशन थांबवण्यात आलेली. सध्या मिग २९ के हे भारतीय नौदलातील आयएनएस हंसवर तैनात आहे. सध्या भारतीय नौदलाकडे अशी ४५ विमाने आहेत. दोघांचा वेग भारतीय हवाई दलातील मिग २९ के विमान हवेमध्ये एक हजार ५०० किलोमीटर प्रती तास वेगाने प्रवास करु शकते. तर दुसरीकडे ३ कोटी ९७ लाख किंमत असणाऱ्या लॅम्बॉर्गिनी हरिकेन या सुपरकारमध्ये १० पॉवर सिलेंडर्स असून ६ ०० हॉर्सपावरहून अधिक ताकद या गाडीमध्ये आहे. या गाडीचा सर्वोत्तम वेग हा ३१० किलोमीटर प्रतीतास इतका आहे. जमीनीवर वेगाच्या दृष्टीने पाहता या दोघांमधील स्पर्धा एका अर्थात फेअर रेस होती असचं म्हणता येईल. मिग २९ के विमान लडाऊ नौकांवरून झेपावणाऱ्या भारतीय नौदा दलातील प्लॅक पँथर स्कॉडमधील आहे. रशियन बनावटीचे हे विमान कोणत्याही हवामानामध्ये उड्डाण करु शकते.