अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या आरोपाखाली दोषी ठरलेल्या स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आसाराम बापूचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत दोघेही एकत्र दिसत आहेत. इतकंच नाही तर व्हिडीओत नरेंद्र मोदी आसाराम बापूच्या पाया पडतानाही दिसत आहेत. आपलं स्वप्न पूर्ण झाल्याचं नरेंद्र मोदी बोलत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. त्यावेळी नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते.

मला जेव्हा कोणीच ओळखत नव्हतं तेव्हापासून आसाराम बापूचा आशिर्वाद मला मिळत असल्याचं मोदी बोलत आहेत. मी बापूंना प्रणाम करतो. ते मला नवी शक्ती देतात. त्याच विश्वासाने मला सत्संगमध्ये येण्याची संधी मिळालीये. स्वत:ला भाग्यवान समजतो. बापूंना माझं नमन असंही मोदी यावेळी बोलत आहेत.

pm narendra modi latest ani interview
पुढची निवडणूक ‘वन नेशन, वन इलेक्शन’ होणार? पंतप्रधान नरेंद्र मोदी मुलाखतीत म्हणाले…
a young boy denied entry to bank of India branch for wearing shorts video goes viral
Nagpur Video: हा कोणता नियम! शॉर्ट पॅन्टमुळे बँकेत No Entry; नागपूरच्या तरुणाचा व्हिडीओ होतोय व्हायरल..
lok sabha election 2024 video of attack bjp complains to eci after old video of shoes throwing on mansukh mandaviya goes viral
केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांच्यावर भरसभेत व्यक्तीने फेकला बूट? जाणून घ्या व्हायरल Video मागील सत्य
What Kangana Said?
कंगना म्हणाली, “सुभाषचंद्र बोस देशाचे पहिले पंतप्रधान होते, त्यांना..”; व्हिडीओ व्हायरल, नेटकरी म्हणाले…

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापू याला बलात्कार प्रकरणात न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. जोधपूरमधील न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावताच आसाराम बापूने डोक्यावर टोपी खाली खेचत डोक्यावर हात ठेवला आणि ढसाढसा रडू लागला. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आसारामवर होता, ज्याची सुनावणी जोधपूरमधल्या विशेष एससी-एसटी न्यायालयात झाली. वय 77 वर्षे असलेल्या आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावणाऱ्या न्यायालयाने शरद व शिल्पी या सहआरोपींनाही प्रत्येकी 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा ऐकल्यानंतर आपले उर्वरीत आयुष्य तुरुंगातच जाणार याची कल्पना आलेला आसाराम कोर्टात ढसाढसा रडला. पण जेव्हा त्याला न्यायालयाबाहेर आणण्यात आलं तेव्हा एका शिपायाला त्याने जेलमध्ये राहणार, खाणार, पिणार आणि मजा करणार असं सांगितलं.

मूळची उत्तर प्रदेशच्या शहाजहाँपूर येथील आणि आसाराम याच्या मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथील आश्रमात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आसारामला अटक करण्यात आली होती. आसारामने जोधपूरनजीकच्या मनाई भागातील आश्रमात बोलावून १५ ऑगस्ट २०१३ च्या रात्री आपल्यावर बलात्कार केल्याचा तिचा आरोप होता. आसारामला इंदूरहून अटक करून १ सप्टेंबर २०१३ रोजी जोधपूरला आणण्यात आले होते. तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत आहे. पोलिसांनी आसाराम व ४ सहआरोपींवर ६ नोव्हेंबर २०१३ रोजी आरोपपत्र दाखल केले होते. संचिता गुप्ता उर्फ शिल्पी ही या दुर्दैवी मुलीच्या हॉस्टेलची वॉर्डन होती तर छिंदवाडातील या आश्रमशाळेचा संचालक होता. शिल्पी व शरदचंद्र यांनी आसारामला या कृष्णकृत्यामध्ये साथ दिल्याचे न्यायालयात सिद्ध झाले व त्यांनाही 20 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.

या खटल्याची सुनावणी १९ मार्च २०१७ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली आणि १६ डिसेंबर २०१७ रोजी ती एस.सी.-एस.टी. प्रकरणांच्या विशेष न्यायालयाकडे वर्ग करण्यात आली होती. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदाविषयक प्रकरणांच्या विशेष न्यायालयात या खटल्यातील अंतिम युक्तिवाद ७ एप्रिलला पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने निकाल २५ एप्रिलला जाहीर करण्यासाठी राखून ठेवला होता.