व्हिडिओ: नितीश कुमारांच्या भाषणावेळी मोदीनामाचा गजर करणाऱ्यांना मोदींनी बसवले शांत !

नितीश कुमारांचे भाषण सुरू झाल्यानंतरही लोक मोदी मोदी घोषणा द्यायचे थांबत नव्हते

PM Modi, Nitish Kumar , Bihar, VIDEO PM appeals for calm as Modi chants drown Nitish Kumar speech , Loksatta, Loksatta news, Marathi, Marathi news
PM appeals for calm as Modi chants : नितीश कुमारांना भाषण करताना व्यत्यय येत होता. ही गोष्ट ध्यानात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवरून उठून पुढे आले आणि त्यांनी जनसमुदायाला शांत बसण्याचे आवाहन केले.

बिहारमध्ये शनिवारी पार पडलेल्या दिघा-सोनेपूर रेल्वेमार्गाच्या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थितांना एक अनोखा प्रकार पहावयास मिळाला. यावेळी मुख्यमंत्री नितीश कुमार भाषणासाठी उभे राहिल्यानंतर उपस्थित जनसमुदाय मोदीनामाचा गजर करत होता. नितीश कुमारांचे भाषण सुरू झाल्यानंतरही लोक मोदी मोदी घोषणा द्यायचे थांबत नव्हते. त्यामुळे साहजिकच नितीश कुमारांना भाषण करताना व्यत्यय येत होता. ही गोष्ट ध्यानात येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी खुर्चीवरून उठून पुढे आले आणि त्यांनी जनसमुदायाला शांत बसण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या उपस्थितीत आज दिघा-सोनेपूर रेल्वेमार्ग आणि पुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नितीश यांनी वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Video pm appeals for calm as modi chants drown nitish kumar speech