Plane Crash in America : अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये भीषण विमान अपघात झाला आहे. यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. फ्लोरिडामध्ये एक खासगी विमान थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळले. रस्त्यावर आदळताच विमानाचा स्फोट झाला. तसेच स्फोटामुळे रस्त्यावर एक खोल खड्डा पडल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा थरकाप उडवणारा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
नेमकी घटना काय?
फ्लोरिडामध्ये एक विमान थेट रस्त्याच्या मध्यभागी कोसळले. विमान आदळताच एक मोठा स्फोट झाला आणि रस्त्यावर आगीच्या ज्वाळा पसरल्या. या स्फोटामुळे रस्त्यावर एक खोल खड्डा पडला असून, विमानाचे अवशेष सर्वत्र विखुरले गेले आहेत. अपघाताच्या वेळी विमानात ९ लोक होते, अपघातात या सगळ्यांचा मृत्यू झाला आहे. विमान कोसळले तेव्हा रस्त्यावर इतर कोणी व्यक्ती उपस्थित होत्या का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. सदर अपघाताचा थरारक व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विमान अपघाताचा व्हिडीओ व्हायरल
विमान अपघाताची घटना जवळच असलेल्या कारमधील व्यक्तींनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. व्हिडीओमध्ये विमान आकाशातून वेगाने खाली येताना आणि रस्त्यालगत आदळल्यानंतर त्याचा स्फोट होताना स्पष्टपणे दिसत आहे. या अपघातामुळे जमिनीवर एक मोठा खड्डा पडला असून, त्याभोवती आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. विमान घरांपासून अवघ्या काही फुटांच्या अंतरावर आणि रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या अगदी जवळ कोसळले. अपघातानंतर संपूर्ण परिसरात काळ्या धुराचे लोट पसरले. क्षणार्धात हा अपघात झाला. आगीचे लोळ आणि धुराचे लोट पसरल्याने आकाश काळं झाल्याचं व्हिडीओत दिसून येतं आहे. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे.
प्रत्यक्षदर्शींनी या विमान अपघाताबाबत काय सांगितलं?
अपघात झालेलं हे विमान लिअरजेट ६० या प्रकारतलं होतं. दक्षिण फ्लोरिडातील निवसी भागातून जात असताना विमान अचानक खाली कोसळलं. रस्त्यावर मोठा स्फोट झाला आणि भीषण आग लागली. आकाशात आगीचा मोठा गोळा तयार झाल्याचं दृश्यांमध्ये दिसून आलं आहे. अपघातस्थळी काळा धूर आणि आगीच्या ज्वाळा पसरल्या होत्या. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार विमान निवासी घरांच्या अगदी जवळ कोसळलं. तसंच अचानक हा अपघात झाल्याने लोक खूप घाबरून गेले होते. विमान जर निवासी भाग असलेल्या घरांवर कोसळलं असतं तर कदाचित आणखी मोठा अपघात झाला असता. विमान आकाशातून कोसळतानाचा व्हिडीओ काही व्यक्तींनी रेकॉर्ड केला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.
