भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर जगभरातून त्यांचा विरोध करण्यात येत आहे. भारतातही मोठ्या प्रमाणत गदारोळ निर्माण झाला असून अजूनही या घटना थांबताना दिसत नाहीयेत. राजस्थानमधील अजमेर दर्गाच्या एका खादीमांनी ‘नुपूर शर्मांचे शिरच्छेद करणाऱ्या व्यक्तीला मी माझं घर देणार’, असं खळबळजनक विधान केलं आहे.

हेही वाचा- आनंद महिंद्रांनी शेयर केलेल्या भन्नाट गाडीचा व्हिडीओ पाहिलात का?, म्हणाले, ‘माझ्या अंदाजाप्रमाणे…’

पोलिसांकडून शोध सुरु

दर्ग्याचे खादिम सलमान चिश्ती यांनी हा व्हिडिओ शूट करून व्हायरल केला आहे. या प्रकरणी अजमेर शहरातील अलवर गेट पोलीस ठाण्यात सलमान चिश्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खादीम सलमान चिश्ती यांनी दारूच्या नशेत हा व्हिडिओ बनवला असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सुमारे दोन मिनिटे ५० सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सलमान चिश्तींनी नुपूर शर्मांना उघडपणे जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या धमकीनंतर सलमान चिश्ती फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

हेही वाचा- उत्तर प्रदेशमध्ये हिंदू देवतांचे फोटो असणाऱ्या कागदी प्लेटमधून चिकनची विक्री करणाऱ्याला अटक

परिसरात तणावाचे वातावरण
व्हिडिओमध्ये खादिम सलमान चिश्तीने नुपूर शर्माला गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच जी व्यक्ती नुपूर शर्माचा शिरच्छेद करेल त्याला मी माझं घर आणि संपत्ती बक्षीस म्हणून देईन, असा दावाही केला आहे. या व्हिडिओनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्या दर्ग्यातून नेहमी शांततेचा, बंधू भावनेचा संदेश दिला जातो. त्याच दर्ग्याचे खादीम जीवे मारण्याची धमकी देत असतील तर त्याचा समाजावर काय परिणाम होणार, अशी चर्चा सुरु आहे.