राष्ट्रीय तपास यंत्रणा ( एनआयए ) आणि अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) विरोधात दहशतवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपाखाली एकूण १५ राज्यांमध्ये कारवाई केली आहे. पीएफआयकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाटणा येथील एका रॅलीला लक्ष्य करण्याची योजना आखण्यात आली होती, असा तपास यंत्रणांकडून करण्यात आला आहे. दरम्यान, उत्तरप्रदेश एटीएसने PFI च्या चार सदस्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून काही कागदपत्रं आणि व्हिडीओ असलेला पेनड्राईव्ह जप्त करण्यात आला आहे. तसेच या पेनड्राईव्हमधून काश्मीरी मुजाहीद आणि आयएस संदर्भात व्हिडीओ असल्याचेही समोर आले आहे.

हेही वाचा – पुण्यातील ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदेंची कडक शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शादाब अझीझ कासमी, मुफ्ती शहजादा, मौलाना साजिद आणि इस्लाम कासमी, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चार जणांकडून काश्मीर मुजाहीद आणि आयएस संदर्भातील ७ फाईल, ११ व्हिडीओ आणि काही फोटो जप्त करण्यात आले आहेत. तसेच भारतविरोधी कारवाई करणाऱ्या संघटनाशी संबंध असणारे व्हिडीओही एटीएसच्या हाती लागले आहेत. २०४७ पर्यंत भारताला ‘गझवा-ए-हिंद’ बनवण्याचे आणि भारतात शरीया कायदा लागू करण्यासाठी या संघटनेचे प्रयत्न सुरू होते. त्यासाठी सीएएम आणि एनआरसी विरोधातील आंदोलनाचाही वापर करण्यात आला होता. या आरोपींनी मंजीरी आणि केरळमध्ये ट्रेनिंगही घेतले होते.

हेही वाचा – पुण्यात ‘पाकिस्तान जिंदाबाद’चे नारे ऐकून राज ठाकरे संतापले; शाह, फडणवीसांना म्हणाले, “अशा घोषणा भारतात दिल्या जाणार असतील तर…”

दरम्यान, दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील १५ राज्यांत छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केली आहे. महाराष्ट्रातही दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २०हून अधिक जणांवर कारवाई केली आहे.