Vijay Mallya and Lalit Modi : भारतात कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप असलेला फरार उद्योजक विजय माल्या आणि इंडियन प्रीमियर लीगचे माजी चेअरमन ललित मोदी हे लंडनमध्ये एका पार्टीत एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आहे. एवढंच नाही तर दोघांनी या पार्टीत एकत्र गाणं गायलं असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामुळे ललित मोदी आणि विजय माल्या हे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये विजय मल्ल्या आणि ललित मोदी हे पार्टीत मौजमजा करताना दिसत आहेत. तसेच या पार्टीत अनेक दिग्गज उपस्थित असल्याचंही बोललं जात आहे. उपस्थितांपैकी एक माजी क्रिकेटपटू क्रिस गेलही होता. या व्हिडीओत ललित मोदी आणि विजय मल्ल्या हे प्रसिद्ध गायक फ्रँक सिनात्रा यांचं ‘आय डिड इट माय वे’ हे गाणं गात असल्याचं दिसत आहे. ललित मोदीने हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या संदर्भातील वृत्त इंडिया टुडेनी दिलं आहे.

दरम्यान, ललित मोदीने हा व्हिडीओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, “गेल्या रविवारी लंडनमधील माझ्या घरी झालेल्या पार्टीच्या काही आठवणी. या कार्यक्रमासाठी खास ३१० मित्रांबरोबर आणि कुटुंबाबरोबर एक अद्भुत रात्र घालवली. उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार, आता आशा आहे ही हा व्हिडीओ इंटरनेटवर धुमाकूळ घालणार नाही. निश्चितच वादग्रस्त आहे, पण मी हेच सर्वोत्तम करतो”, असं ललित मोदीने कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

ललित मोदीवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप

ललित मोदी हे नाव भारतासह जगभरातील क्रिकेट विश्वाला माहिती आहे. आयपीएलच्या पहिल्या हंगामात ललित मोदीची मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. ललित मोदीवर आर्थिक घोटाळ्याचे आरोप आहेत. या आरोपातून वाचण्यासाठी ललित मोदीने विदेशात पलायन केल्याचा आरोप केला जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजय मल्ल्यावर ९ हजार कोटींचं कर्ज थकवल्याचा आरोप

नऊ हजार कोटींचं कर्ज थकवून देशाबाहेर पळालेला विजय मल्ल्या आता पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विजय मुल्ल्या आणि ललित मोदी यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताने ब्रिटनकडे मागणी केलेली असल्याची माहिती सांगितली जाते.