भारतीय बँकांचे ९ हजार कोटी बुडवणारा विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हल मैदानावर भारत-इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी आला होता. एएनआय या वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचा एक व्हिडिओच प्रसारित केला आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेला कसोटी सामना पाहण्यासाठी विजय मल्ल्याने हजेरी लावली होती असा दावा एएनआयने केला आहे. विजय मल्ल्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाची भेट घेणार होता.

मात्र सरकारने परवानगी नाकारल्याने त्याची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. भारतीय क्रिकेट संघ पाच कसोटी सामन्यासाठी जेव्हा इंग्लंडला पोहचला तेव्हाही विजय मल्याने त्यांना भेटण्याचे ठरवले होते. मात्र संघ व्यवस्थापनाने त्याला भेटण्याची परवानगी दिली नाही. विजय मल्ल्या भारतीय बँकांचे ९ हजार कोटी बुडवून फरार झाला आहे. सध्या तो इंग्लंडमध्ये आहे. भारताकडून त्याच्या प्रत्यार्पणासाठी प्रयत्न सुरू आहेत.