Vikash Yadav Former Indian Spy : खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी एका भारतीय नागरिकावर अमेरिकेतील एफबीआयकडून (Federal Bureau of Investigation) आरोप निश्चित करण्यात आले आहेत. विकास यादव असे या भारतीय नागरिकाचे नाव असून त्यांचा यापूर्वी मूळ आरोपपत्रात सीसी १ या नावाने उल्लेख होता. गुरपतवंत सिंग पन्नूला भारताने दहशतवादी घोषित केले आहे. त्याच्याकडे सध्या अमेरिकन नागरिकत्व आहे. यूएस अॅटर्नी जनरल मेरिक बी गारलँड म्हणाले, आजचे आरोप हे दाखवून देतात की न्याय विभाग अमेरिकन नागरिकांना लक्ष्य करण्याचा, धोक्यात आणण्याचा आणि प्रत्येक अमेरिकन नागरिकाला ज्या अधिकारांचा हक्क आहे ते कमी करण्याचा प्रयत्न सहन करणार नाही. दरम्यान, एफबीआयने विकास यादव याला वॉन्टेट लिस्टमध्ये टाकले आहे.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये फायनान्शिअल टाईम्सच्या वृत्तानुसार पन्नूच्या हत्येचा कट अमेरिकेच्या भूमीत रचण्यात आला होता. परंतु, तो कट हाणू पाडण्यात आला. पन्नू हा अमेरिकन नागरीक असून भारताने त्याला दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. यानतंर अमेरिकेच्या न्याय विभागाने या प्रकरणी न्यूयॉर्क जिल्हा न्यायालयात खटलाही दाखल केला होता. यामध्ये निखिल गुप्ता नावाचा भारतीय नागरिक आणि एका अज्ञात भारतीय सरकारी अधिकाऱ्यावर पन्नूच्या हत्येची योजना आखल्याचा आरोप करण्यात आला. निखिल गुप्ताला गेल्यावर्षी जूनमध्ये अटक करण्यात आली. निखिल गुप्ता सध्या अमेरिच्या तुरुंगात आहे.

हेही वाचा >> पन्नू हत्या कट प्रकरणातील आरोपी निखिल गुप्ता अमेरिकेच्या ताब्यात; भारतासाठी डोकेदुखी ठरलेलं काय आहे हे प्रकरण?

पन्नूची हत्या करण्यासाठी गुप्ता यांना भारत सरकारच्या अधिकाऱ्याने नियुक्त केले होते. या हत्येसाठी गुप्ताने हिटमॅन (मारेकरी) नेमला होता. पण प्रत्यक्षात तो अमेरिकन सरकारचा गुप्तहेर होता. इंटेलिजन्स एजंटला हिटमॅन म्हणून टार्गेट करण्यासाठी त्यांना एक लाख डॉलर्सचे कंत्राट देण्यात आले होते.

विकास यादव यांच्यावर कोणते आरोप?

खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा अयशस्वी कट रचल्याप्रकरणी अमेरिकन वकिलांनी गुरुवारी महत्त्वपूर्ण खुलासा केला. यामध्ये विकास यादव यांचे नाव पुढे आले. विकास यादव यांच्यावर मनी लॉन्ड्रिंग आणि हत्या असे गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. हे आरोप न्यूयॉर्कच्या न्यायालयात दाखल केलेल्या दुसऱ्या आरोपाचा भाग आहेत.

Story img Loader