Premium

Video : “विनेश तू तर माझ्या कुटुंबातीलच…”, काँग्रेसने शेअर केला पंतप्रधानांचा ‘तो’ जुना व्हिडीओ

Congress on Wrestler Protest : काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत पंतप्रधानांवर टीका केली आहे.

narendra modi with vinesh phogat
काँग्रेसने शेअर केला जुना व्हिडीओ (फोटो – काँग्रेस ट्विटर)

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नव्या संसदेचे लोकार्पण झाले. जंतर मंतरवर गेल्या महिन्याभरापासून आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी आपला आवाज उंचावण्याकरता नव्या संसद भवनासमोर महापंचायत घेण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे. यावेळी कुस्तीगीर आणि पोलिसांमध्ये झटापटही झाली. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचं नाव उज्ज्वल करणाऱ्या महिला खेळाडूंना अशी वागणूक मिळाल्याने विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे. एवढंच नव्हे तर, काँग्रेसच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी, बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा एक जुना व्हिडीओ शेअर करत पंतप्रधानांवर टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >> Video : “अहंकारी राजा…”, कुस्तीपटूंचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत राहुल गांधींचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र, म्हणाले…

काँग्रेसने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बजरंग पुनिया, विनेश फोगाटसह काही खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चर्चा करत आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विनेश फोगाटला “तू तर माझ्या कुटुंबातील एक आहे” असं म्हणत आहेत. तसंच, “तुझ्या संपूर्ण कुटुंबाला ओळखतो”, असंही ते म्हणाले. तसंच, “तुला मी निराश पाहू शकत नाही”, असंही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणत आहेत. काँग्रेसने हा फोटो ट्वीट करून “हमारे देश की बेटिया” असं उपरोधिक कॅप्शन दिलं आहे. या व्हिडीओ जोड व्हिडीओ देत आजच्या आंदोलनाचे फुटेजही त्यात टाकण्यात आले आहेत.

नेमकं काय घडलं?

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. यानंतर ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हाही दाखल झाला. पण, ब्रिजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीकरत कुस्तीपटू २३ एप्रिलपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करत आहेत. त्यापार्श्वभूमीवर कुस्तीपटूंनी जंतर-मंतर ते नवे संसद भवन अशा मार्चचं आयोजन केलं होतं. त्यानुसार कुस्तीपटू ११.३० मिनिटांनी नव्या संसद भवनाकडे निघाले होते. पण, त्यापूर्वीच पोलिसांनी कुस्तीपटू साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया यांच्यासह अन्य काही जणांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि कुस्तीपटूंमध्ये झटापट झाल्याच समोर आलं आहे. बजरंग पुनियानेदेखील ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “एखादं सरकार आपल्या खेळाडूंबरोबर असं वागतं का? आम्ही काय गुन्हा केला आहे,” असं सवाल बजरंग पुनियाने उपस्थित केला आहे.

काँग्रेसकडून आणखी एक ट्वीट करण्यात आलं आहे. “नि:शस्त्र आणि निर्दोष असणे हा सर्वात मोठा गुन्हा आहे. जे गुन्हेगार नसतील.. मारले जातील”, असा उपरोधिक टोलाही काँग्रेसने ट्वीटद्वारे केला आहे.

दरम्यान, “आमचं आंदोलन संपलेलं नाही. पोलिसांच्या ताब्यातून सुटून आम्ही पुन्हा जंतर मंतरवर सत्याग्रह सुरू करू. या देशात आता हुकुमशाही चालणार नाही. तर, महिला कुस्तीपटूंचा सत्याग्रह चालेल”, असा ठाम निर्धार साक्षी मलिकने केला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vinesh you belong to my family congress shared that old video of the prime minister sgk

First published on: 28-05-2023 at 18:04 IST
Next Story
“आनंद? दु:ख? गर्व? लाज? आपल्याला या क्षणी काय वाटायला हवं?”, अभिनेत्री पूजा भट्टचं सूचक ट्वीट!