उद्योगपती गौतम अदाणी यांचा तब्बल ९०० दशलक्ष डॉलर्सचा ड्रीम प्रोजेक्ट विझिंजम इंटरनॅशनल सपोर्ट लिमिटेडला हिंसाचाराचं गालबोट लागलं आहे. या प्रकल्पावरून सुरू असलेला वाद लवकर संपण्याची सध्या तरी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. एकाबाजूला केरळ सरकार, न्यायालय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकच्या श्रीमंत व्यक्तीचा अदाणी समूह आहे आणि दुसऱ्या बाजूला मच्छिमारांसह स्थानिकांचा एक समूह आहे, ज्याचे नेतृत्व कथितरित्या लॅटिन कॅथोलिक चर्चचे प्रमुख लोक करत आहेत.

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गेल्याचा चर्चवर आरोप आहे. केरळ पोलिसांनी २६ नोव्हेंबर, शनिवार रोजी विझिंजम, तिरुवनंतपुरम येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्चबिशप डॉ. थॉमस जे नेट्टो यांना मुख्य आरोपी बनवले आहे. एफआयआर मध्ये म्हटले आहे की, आर्चबिशप यांनी अन्य धर्मगुरुंसोबत मिळून कट रचला. एका रिपोर्टनुसार पोलिसांनी याप्रकरणी १० गुन्हे नोंदवले असुन ५० बिशपसह सहायक बिशप चितुरदास आणि अन्य ४५ जणांची नावे आहेत.

Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Kaustubh Kalke
बांधकाम व्यवसायिक कौस्तुभ कळके यांच्या अडचणीत वाढ, पूनर्विकास प्रकल्पात फसवणूक केल्याप्रकरणी आणखी दोन गुन्हे
5 Crore and 45 lakh embezzlement in Nandura Urban Bank
नांदुरा अर्बन बँकेत साडेपाच कोटींचा अपहार, कर्मचाऱ्यांनी ऑनलाईन…
Pune, Youth Cheated, Rs 57 Lakh, Stock Market Investment Scam, NDA Employee, cyber fraud, Victims, lure, police, marathi news,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने ‘एनडीए’तील कर्मचाऱ्याची ५७ लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आंदोलकांच्या हिंसाचारात २९ पोलीस कर्मचारी जखमी झाले आणि अनेक वाहनांचे नुकसान झाले. जमावाने पोलीस स्टेशनला लक्ष्य बनवत काठी आणि दगडफेक केली. शिवाय पोलीस अधिकाऱ्यांवरही हल्ला केला. जखमी पोलिसांना विविध रुग्णालयांध्ये दाखल करण्यात आले आहे. परिसरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहता अन्य जिल्ह्यांमधून अतिरिक्त पोलीस बंदोबस्तासाठी बोलावले आहेत.