उद्योगपती गौतम अदाणी यांचा तब्बल ९०० दशलक्ष डॉलर्सचा ड्रीम प्रोजेक्ट विझिंजम इंटरनॅशनल सपोर्ट लिमिटेडला हिंसाचाराचं गालबोट लागलं आहे. या प्रकल्पावरून सुरू असलेला वाद लवकर संपण्याची सध्या तरी कोणतीही चिन्ह दिसत नाहीत. एकाबाजूला केरळ सरकार, न्यायालय आणि जगातील तिसऱ्या क्रमांकच्या श्रीमंत व्यक्तीचा अदाणी समूह आहे आणि दुसऱ्या बाजूला मच्छिमारांसह स्थानिकांचा एक समूह आहे, ज्याचे नेतृत्व कथितरित्या लॅटिन कॅथोलिक चर्चचे प्रमुख लोक करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यायालयाच्या निर्णयाविरोधात गेल्याचा चर्चवर आरोप आहे. केरळ पोलिसांनी २६ नोव्हेंबर, शनिवार रोजी विझिंजम, तिरुवनंतपुरम येथे झालेल्या हिंसाचार प्रकरणी दाखल गुन्ह्यात आर्चबिशप डॉ. थॉमस जे नेट्टो यांना मुख्य आरोपी बनवले आहे. एफआयआर मध्ये म्हटले आहे की, आर्चबिशप यांनी अन्य धर्मगुरुंसोबत मिळून कट रचला. एका रिपोर्टनुसार पोलिसांनी याप्रकरणी १० गुन्हे नोंदवले असुन ५० बिशपसह सहायक बिशप चितुरदास आणि अन्य ४५ जणांची नावे आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Violence hits adanis 900 million doller dream project vizhinjam international seaport limited in kerala archbishop prime accused msr
First published on: 28-11-2022 at 09:53 IST