रेल्वेचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांचे हे व्हायरल व्हिडिओ पाहाच

बेजबाबदारपणे रेल्वेचे रुळ ओलांडणे धोकादायक असल्याचेच यावरुन सिद्ध होते. त्यामुळे या लोकांचा निषेध असो अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

रेल्वे रुळाच्या पलिकडे जायचे असल्यास नागरिक आणि वाहने कोणतीही भिडभाड न ठेवता अगदी सहज रुळ ओलांडताना दिसतात. अशाप्रकारे रेल्वे रुळ ओलांडून पलिकडे जाणे हे अतिशय धोक्याचे ठरु शकते. हा धोका माहीत असूनही जीवाची पर्वा न करता नियम पायदळी तुडवल्याने मोठे अपघात होताना दिसतात. नुकतेच अमृतसर येथे रेल्वे रुळावर रावणदहनाच्या कार्यक्रमादरम्यान ६१ जणांचा मृत्यू झाला होता. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वे रुळांवर लोक कशापद्धतीने चुकीचे वागतात याबाबतचे व्हिडियो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रुळावरुन रेल्वे येत असतानाही दुचाकी, चारचाकी वाहने चालवणारे कशापद्धतीने रुळावर घुसतात हे या व्हिडियोमध्ये दिसत आहे.

 

Not following, not stopping and not seeing the train is coming the driver continuously honking at the level crossing but many people were not bothering that the train is coming and started blocking its way to the level crossing of the railway tracks. Shame of those people pic.twitter.com/jh8gE9pNTT

— Suvojit Mukherjee (@SuvojitMukher18) October 24, 2018

रेल्वे रुळाच्या अलिकडे असलेल्या लोकांना काही जण थांबा असे सांगताना दिसत आहे. मात्र तरीही हे लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. ते या सूचना देणाऱ्या माणसाला अजिबात प्रतिसाद न देता आपली वाहने पुढे रेटत असल्याचे दिसते. पलीकडून येणारी रेल्वे हॉर्न देत असतानाही हा सगळा प्रकार सुरु असल्याने लोकांना जीवाची पर्वा नाही का असाच प्रश्न आपल्याला यावरुन पडतो. आता हा व्हिडियो नेमका कुठला आहे याबाबतची माहिती अद्याप मिळालेली नसून ट्विटरवर तो शेअर करण्यात आला आहे. मात्र अशाप्रकारे बेजबाबदारपणे रेल्वेचे रुळ ओलांडणे धोकादायक असल्याचेच यावरुन सिद्ध होते. त्यामुळे या लोकांचा निषेध असो अशा भावना सोशल मीडियावर व्यक्त केल्या जात आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral video how people flout safety rules at railway crossings

ताज्या बातम्या