viral video of Naked woman rings doorbells at night in Uttar pradesh Rampur district spb 94 | Loksatta

मध्यरात्री ‘डोअरबेल’ वाजवून होते गायब! उत्तर प्रदेशमध्ये नग्न महिलेची चर्चा; VIDEO व्हायरल

एक महिला मध्यरात्री नग्न अवस्थेत लोकांच्या घरावरील डोअरबेल वाजवत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

viral video of Naked woman rings doorbells,
फोटो – सोशल मीडिया

एक महिला मध्यरात्री नग्न अवस्थेत लोकांच्या घरावरील डोअरबेल वाजवत असल्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेकाच्या मनात भिती निर्माण झाली आहे. दरम्यान, हा व्हिडीओ उत्तर प्रदेशाच्या रामपूरमधील असून पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – Video: नशा उतरवण्यासाठी बायकोने नवऱ्याला पाण्यात नेलं आणि असं काही केलं जे पाहून पोट धरून हसाल

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २९ जानेवारी रोजी उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एका महिलेने नग्न अवस्थेत लोकांच्या घरावरील डोअरबेल वाजवल्याचा प्रकार घडला होता. या घटेनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले होते. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. या प्रकरणी स्थानिकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर रामपूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला होता.

दरम्यान, पोलिसांनी संबंधित महिलेला ताब्यात घेतले असून ही महिला गेल्या पाच वर्षांपासून मानसिक रोगी असल्याची माहिती रामपूर पोलिसांनी दिली आहे. तसेच याप्रकरणी महिलेच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली असून यापुढे असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घेण्यासंदर्भात निर्देशही पोलिसांनी तिच्या कुटुबियांना दिले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 10:13 IST
Next Story
विश्लेषण: गौतम अदाणींचा पाय आणखी खोलात; S&P Dow Jones च्या यादीतून ‘अदाणी’ची गच्छन्ती! नेमकं घडतंय काय?