scorecardresearch

वीरभद्र सिंग यांचा उद्या शपथविधी

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६८ जागांपैकी ३६ जागांवर विजय मिळाला होता.

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला धूळ चारण्यात यशस्वी ठरलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वीरभद्र सिंग मंगळवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला ६८ जागांपैकी ३६ जागांवर विजय मिळाला होता. या विजयानंतर वीरभद्र सिंग यांची काँग्रेसच्या विधिमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली होती, काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याने राज्यपाल ऊर्मिला सिंग यांनी त्यांना सरकार स्थापनेसाठी पाचारण केले. दरम्यान वीरभद्र सिंग यांनी नवी दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेऊन भावी मंत्रिमंडळाबाबत चर्चा केली. त्यानुसार मंगळवारी ते एकटेच शपथ घेणार असून सहकारी मंत्र्यांची नावे ते आठवडाभरात निश्चित करणार आहेत. या मंत्रिमंडळात तरुण-ज्येष्ठ लोकप्रतिनिधींचा तसेच समाजातील सर्व घटकांचा समावेश असेल, असे त्यांनी सांगितले.
 .. अवघे ७८ वयोमान!
हिमाचल काँग्रेसचे सर्वेसर्वा असणारे ७८ वर्षीय वीरभद्र मंगळवारी सहाव्यांदा मुख्यमंत्री होतील. पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना पक्षाने भरभरून दिले असून मुख्यमंत्रिपदाव्यतिरिक्त सात वेळा आमदार, पाच वेळा खासदार आणि पाच वेळा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशी जवळपास सर्व पदे त्यांनी उपभोगली आहेत.     

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Virbhadra singh going to take cm post tommarow

ताज्या बातम्या