scorecardresearch

पॉर्नहबच्या पालक कंपनीवर व्हिसा व मास्टरकार्डचा बहिष्कार, चाइल्ड पॉर्नोग्राफीचा निषेध

पॉर्नहबवर आमच्या कार्डचा वापर बंद केला जात आहे,” मास्टरकार्डने ई-मेल केलेल्या निवेदनात म्हटले आहे

mastercard
पॉर्नहबच्या पालक कंपनीवर व्हिसा व मास्टरकार्डचा बहिष्कार

पॉर्नहबच्या पालक कंपनीवर व्हिसा व मास्टरकार्डचा बहिष्कार टाकला आहे. न्यूयॉर्क टाइम्सचे लेखक निकोलस क्रिस्टोफ यांनी पॉर्नहब वेबसाईटवर बाल शोषण आणि बलात्काराचे व्हिडिओ असल्याचा अहवाल दिला होता. त्यानंतर व्हिसा व मास्टरकार्डने या बेबसाईटवर आपल्या कार्डच्या वापरावर बंदी घातली आहे.

हेही वाचा- नॅशनल हेराल्ड प्रकरण: मोतीलाल वोरांनी आर्थिक व्यवहार सांभाळल्याचे कुठलेही पुरावे नाहीत, सूत्रांची माहिती

व्हिसा व मास्टरकार्डचा बहिष्कार

या आरोपाअंतर्गत पॉर्नहब बेबसाईटची चौकशी पूर्ण होईपर्यंत नेटवर्कद्वारे पेमेंटची प्रक्रिया स्थगित करण्यासाठी सूचना व्हिसा कंपनीने दिल्या आहेत. तसेच पॉर्नहब बेबसाईटने आमच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे या बेवसाईवरील पेमेंट प्रक्रिया बंद करण्यात आल्याची स्पष्टीकरण मास्टरकार्ड कंपनीने दिले आहे.

हेही वाचा- फोटोच्या नादात कोसळला धबधब्यात, तीन दिवसांपासून शोध सुरू, मित्राने शूट केला व्हिडिओ

बेवसाईटने आरोप फेटाळला

पोर्नहबवर दरवर्षी सुमारे सात दशलक्ष व्हिडिओ पोस्ट केले जातात. यामध्ये अत्याचार आणि तस्करीला बळी पडलेल्या किशोरवयीन मुलींचे व्हिडिओ सापडले आहेत. या प्रकरणी काही गुन्हेगारांना अटक करण्यात आली होती. परंतु पॉर्नहबने हे व्हिडिओ प्रकाशित करुन मोठ्या प्रमाणात नफा मिळवला असल्याचा आरोप क्रिस्टोफ यांनी केला आहे. मात्र, बेवसाईटकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Visa and mastercard boycott of pornhubs parent company dpj

ताज्या बातम्या