scorecardresearch

पाकिस्तानातील भावाच्या भेटीसाठी व्हिसा मंजूर

पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेले मोहम्मद सादिक हे सिक्का यांचे भाऊ असून त्यांच्या तसेच कुटुंबीयांच्या भेटीसाठी हा व्हिसा मंजुर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली : १९४७ मध्ये ताटातूट झालेल्या दोन भावांची ७४ वर्षांनी सोमवारी कर्तारपूर मार्गिकेत भेट झाल्यानंतर नवी दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तांच्या कार्यालयाने शुक्रवारी सिक्का खान या भारतीयास पाकिस्तानात जाण्यासाठी व्हिसा मंजूर केला. पाकिस्तानमध्ये वास्तव्यास असलेले मोहम्मद सादिक हे सिक्का यांचे भाऊ असून त्यांच्या तसेच कुटुंबीयांच्या भेटीसाठी हा व्हिसा मंजुर करण्यात आला आहे. याबाबत पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तालयाने म्हटले आहे की, नोव्हेंबर २०१९ मध्ये व्हिसामुक्त प्रवेश असलेली कर्तारपूर मार्गिका पाकिस्तानच्या बाजूला खुली करण्यात आली. या दोन भावांची तेथे भेट झाली. उभय देशांचे लोक यातून कसे जवळ येत आहेत, हेच यातून दिसून येते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Visa approved for brother visit to pakistan akp

ताज्या बातम्या