अल्पवयीन मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्याने पित्यानेच तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापलेल्या पित्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचं पीडितेचं म्हणणं आहे. मुलीने शिक्षिकेला याबद्दल माहिती दिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. ही घटना आंध्र प्रदेशच्या विशाखापट्टणममध्ये घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी फोनवर जास्त वेळ घालवत असल्यामुळे संतापलेल्या वडिलांनी तिच्यावर बलात्कार केला. त्याने तिच्यावर अनेकदा बलात्कार केल्याचा आरोप आहे. या आघाताचा सामना करू न शकलेल्या मुलीने नुकतंच तिच्या शिक्षिकेला झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत सांगितले. शिक्षिकेने तिच्या वडिलांना शाळेत बोलावले आणि विचारणा केली असात आरोपीने माफी मागितली.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vizag man arrested for raping his minor daughter for spending too much time on phone hrc
First published on: 25-01-2022 at 12:37 IST