मोदींनी अहंकारी मंत्र्यांना बाहेरचा रस्ता दाखवावा- केजरीवाल

सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली

VK Singh, demands Kejriwal, Narendra Modi, Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
मोदींना खऱ्या अर्थाने आजचा दसरा साजरा करायचा असेल तर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून अहंकाराला काढून टाकले पाहिजे

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी दलित कुटुंबासंदर्भात केलेल्या विधानाबद्दल त्यांची मंत्रिमंडळातून आज संध्याकाळपर्यंत हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली आहे. हरियाणातील दलित कुटुंबावर करण्यात आलेल्या हल्ल्यासंदर्भात भाष्य करताना, कुणी कुत्र्याला दगड फेकून मारला तर त्यामध्ये सरकारची काय चूक, असे विचारत सिंग यांनी सरकारचा बचाव करण्याचा प्रयत्न केला होता. व्ही.के.सिंह यांचे हे विधान लज्जास्पद असून त्यामुळे अनुसूचित जमातींसाठी तयार करण्यात कायद्याचेही उल्लंघनही झाले आहे. त्यामुळे सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केजरीवाल यांनी केली. आजचा दसऱ्याचा दिवस वाईट शक्ती आणि अहंकारावर चांगल्या शक्तींनी मिळविलेल्या विजयाचे प्रतिक म्हणून साजरा केला जातो. मोदींना खऱ्या अर्थाने आजचा दसरा साजरा करायचा असेल तर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून अहंकाराला काढून टाकले पाहिजे. त्यांनी आज संध्याकाळपर्यंत सिंह यांना बाहेरचा रस्ता दाखवला पाहिजे, असे केजरीवालांनी म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Vk singh must be sacked by evening demands kejriwal vk singh demands kejriwal narendra modi loksatta loksatta news marathi marathi news %e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a5%80%e0%a4%82%e0%a4%a8